पान:लोकमान्य टिळक यांचे चरित्र -उत्तरार्ध खंड 3.pdf/१२३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

५६ लो० टिळकांचे चरित्र भाग २ पण त्यावेळी ते नेमस्तातच मोडत होते. अजून ते राष्ट्रीय पक्षात यावयाचेच होते. ते यावेळी नेमस्त असल्याचा पुरावा हाच की पुणे येथे भरलेल्या प्रां० परिषदेला त्यानी अध्यक्ष व्हावे अशी विनंति टिळकामार्फत केळकरानी जाऊन त्याजकडे समक्ष केली होती. पण कॉंग्रेसमध्ये सामील नसलेल्यांची ही सभा असे म्हणून त्यानी ते आमंत्रण नाकारले. एरवी ते हा मान सुखासुखो दवडते ना ! पण या पुढेहि काही दिवस ते नेमस्तच होते. कारण नारायणराव चंदावरकर समर्थ वगै- रेनी जी सुधारणांची योजना लिहून प्रसिद्ध केली तिच्यावर त्यांची एक सही होती. नोव्हेंबर महिन्यात काँग्रेस कमिटीने आपला सुधारणांचा मसुदा तयार केला. आणि मुस्लिमलोगनेहि आपला मसुदा तयार केला. बॅ. वैपटिस्टा यानी महाराष्ट्र होमरुल लीगच्या तर्फे आपला मसुदा पूर्वीच केला होता आणि अशा रीतांने तीन मसुदे लखनौ येथील राष्ट्रीय सभेपुढे विचाराकरिता जाऊन पडले. लंडन काँग्रेस कमिटीतर्फे सर कृष्ण गोविंद गुप्त यांची लखनौ काँग्रेसला प्रतिनिधी म्हणून निवड झाली. ते नोव्हेंबरच्या अखेरीला मुंबईस आले तेव्हा त्यानीहि आपल्या भाषणात सांगितले की होमरूलसंबंधाने यापुढे विलायतेत खूप जोराची चळवळ झाली पाहिजे, अशा रीतीने लखनौच्या राष्ट्रीयसभेच्या सुमाराला लोक- मताचे एकीकरण होमरूलवर होऊ लागले होते. जिना यांनी अहमदाबादेस म्हटल्याप्रमाणे आता " मवाळ व जहाल हा फरक नष्ट झाला आहे आपण सर्व नॅशनॅलिस्टच झालो " हे विधान जवळजवळ खरे होऊ पाहू लागले. या सर्व गोष्टीना उद्देशून केसरीने ता. ५ डिसेंबरच्या अंकात या वाढत्या ऐक्यभावनेचे अभिनंदन केले. या गोष्टीचा कदाचित् सगळ्यात खात्रीलायक पुरावा म्हटला म्हणजे ता. १० डिसेंबर रोजी मुंबईस ना. गोकुळदास पारेख यांच्या अध्यक्षते- खाली मुंबई व मद्रास होमरूल लीगच्या शाखामार्फत अॅडव्होकेट सेटलूर यांचे 'हिंदी- स्वराज्य' या विषयावर व्याख्यान झाले व शेवटी पारेख यानी समारोपात असे सांगितले की होमरूलच्या बाबतीत व्याख्याते व मी यांचे एकच मत आहे. व याहि- पेक्षा आणखी पुरावा म्हणजे मुंबई प्रांतिक काँग्रेसकमिटीने टिळकाना ऑल इंडिया काँग्रेस कमिटीत सभासद निवडले ! ता. १७ डिसेंबर रोजी टिळकांच्या अध्यक्षतेखाली सार्वजनिक सभेच्या तर्फे लखनौच्या काँग्रेसला जाणाऱ्या प्रतिनिधींची निवडणूक झाली. सार्वजनिक सभा ही कोणत्याहि काँग्रेस कमिटीला जोडून न घेता स्वतंत्र राहिली होतो. आणि अशा संस्थाना मतदारीचा हक्क मिळावा अशी राष्ट्रीय पक्षाची मागणी असून ती मुंब- ईच्या ठरावाने मान्य झाल्यामुळे पुणे शहराला स्वतंत्र रीतीने प्रतिनिधी निवडून पाठविण्याचा मार्ग मोकळा झाला होता. मुंबई इलाख्यात इतरहि काही जुन्या व स्वतंत्र राहिलेल्या संस्था असून त्यांचीहि अडचण अशीच निघून गेली होती. यामुळे समेटाचा वाद पूर्णपणे मिटला व यापुढे गाडी पुनः रूळावर चालू झाली. अशा रीतीने होमरूल निदान त्यातील महत्त्वाचा भाग सुधारणांच्या रूपाने एकदम &