पान:लोकमान्य टिळक यांचे चरित्र -उत्तरार्ध खंड 3.pdf/१२२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

भाग २ खटल्या नंतरची चळवळ ५५ राष्ट्र स्वराज्यसंघातर्फे तिसरे व्याख्यान ता. ८ आक्टोबर रोजी रामचंद्र गणेश प्रधान यांचे केळकर यांचे अध्यक्षतेखाली झाले आणि चवथे व्याख्यान ता. १५ आक्टोबर रोजी पुण्यासच नगरचे वकील हरी केशव पटवर्धन यांचे झाले. अशा रीतीने या जामीनकोच्या खटल्याने आता कोणी बघत नाही ही गोष्ट सिद्ध कर- ण्याचा पद्धतशीर प्रयत्न सुरू झाला व तो यशस्वी ठरला. यापुढेहि एक पाऊल टाकून संघाचे अध्यक्ष वॅ. बॅपटिस्टा यानी स्वराज्यघटनेचा एक मसुदा तयार करून तो प्रसिद्ध केला. त्याला उद्देशून केसरीने लिहिले की स्वराज्याची मागणी हे लोक करतात पण जबाबदार रीतीने विधायक घटना बनवून स्वराज्य कसे हवे ते सांगावे ते सांगत नाहीत अशी काही नेमस्त लोकांची नेहमी तक्रार असते तिला बॅ. बॅपटिस्टा यानी प्रत्यक्ष उत्तर दिले. ता. २१ आक्टोबर रोजी अहमदाबाद येथे मुंबई प्रां. परिषद भरली ती अर्थातच उभय पक्षांची झाली. या परिषदेचे अध्यक्ष वॅ. जिना हे होते. त्यानी आपल्या भाषाणात असे सांगितले की आजवर चाललेले राज्याचे धोरण सर- काराने यापुढे पूर्णपणे बदलले पाहिजे. बॅ. जिना हे त्यातल्यात्यात मुंबईच्या नेमस्त कंपूपैको असल्यामुळे त्यानी भाषण थोडे जपूनच केले आणि त्यांच्या बोलण्यात आवेश असला तरी मुद्यात तो तितकासा नव्हता. ना. गोखले यानी आपल्या मृत्यूपूर्वी एक सुधारणांची योजना केली होती तिचा स्पष्ट उल्लेख न करिता जिनानी तिचा अनुवाद केला. आणि वरिष्ठ कौन्सिलातील १९ सभासदानी सर शंकरन नायर यांच्या सूचनेवरून जो एक खलिता विलायत सरकारकडे पाठविला होता त्याच्या अनुरोधाने ते बोलले. पण सर्व नेमस्तांची होच मनोवृत्ती नव्हतो म्हणून ना. श्रीनि वास शास्त्री यानी आग्रा येथे ता. १४ आक्टोबर रोजी व्याख्यान दिले. त्यात ते असे म्हणाले की यापुढे सरकारच्या नुसत्या आश्वासनानी आमचे समाधान न होता आम्ही होमरूलकरताच प्रयत्न करणार. जिना यानी थोडी चूकहि केली ती अशी की त्यानी आपला आधार म्हणून गोखले यांची योजना घेतली होती. पण ती केवळ टाचणवजा असून खाजगी रीतीने सर आगाखान यांच्याशी झालेल्या. चर्चेत त्याना सांगितली होती. ही योजना आगाखान यांच्या संग्रही असून पुढे त्यानी ती गोखले यांचे राजकीय मृत्युपत्त्र अशा नावाने प्रसिद्ध केली. अर्थात् ही योजना व जिना यानी रेखाटलेली योजना याच्यात तंतोतंत साम्य पाहून लोकानी जिना यांच्यावर उघड आक्षेप आणला की जिना यानी गोखल्यांचे नाव छपवून योजना आपली म्हणून पुढे काढिली यात त्यानी चोरी केली. पण जिना यांचे दुसरेहि एक चुकले ते असे की गोखल्यांची योजना दोन वर्षांची शिळी होती व त्यानंतर आतापर्यंत बरीच खदलाबदल होऊन लोकांच्या आकांक्षेची मजल पुढे गेली होती. १९ नामदार सभासदानी योजना लिहून पाठविली तिला महत्त्व इतकेच होते की विलायतेत ज्याना जबाबदार म्हणतील अशा लोकानी ती केली होती. पण या १९ तले बहुतेक लोक नेमस्त होते. ना. पटेल हेहि त्यात एक होते.