पान:लोकमान्य टिळक यांचे चरित्र -उत्तरार्ध खंड 3.pdf/१२१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

५४ 45 लो० टिळकांचे चरित्र भाग २ दाखविले ते निघून जाणार कसे ? आणि आपली राजकीय प्रगति होणार कशी ? ती आमच्या प्रयत्नाशिवाय नाही. अर्थात् तो प्रयत्न सर्वच्या सर्व उरलाच आहे. हायकोर्टाच्या निकालाचा उपयोग इतकाच की वाटेतील भीति आता गेली. आळशी लोकांची सबब गेली. टिळक व बेझंटवाई हे बंधमुक्त झाले तरी ते काही राष्ट्राच्या जन्माला पुरले नाहींत. मानीव भीति किंवा विन मार्गातून दूर होण्याला आम्ही निमित्त झालो पण खरा उद्योग तुमचा तुम्हीच केला पाहिजे. " टिळक म्हणतात, सर्वांनीच आता स्वराज्यसंघाचे सभासद झाले पाहिजे वेवढेच केसरीचे तुम्हास आग्रहपूर्वक सांगणे आहे आणि तुम्ही 'तथास्तु' केव्हां म्हणता याची तो मोठ्या उत्सुकतेने वाट पहात आहे ! (९) खटल्यानंतरची चळवळ टिळकापासून सरकाराने जामीन घेतला तरी चळवळ थांबू शकत नव्हती व थांबविण्याचा टिळकांचा व इतरांचा विचार नव्हता. म्हणून या निकालाविरुद्ध दाखल केलेल्या अपिलाचा निकाल होण्यापूर्वीच स्वराज्यविषयक व्याख्यानमाला सुरू करण्याचे ठरले. त्यात फक्त सावधगिरी एवढीच ठेवण्यात आली की तोंडी केलेल्या भाषणांचा विपर्यास होऊ शकतो व खरे खोटे ठरवीत बसण्याची पाळी येते ती न यावी म्हणून, व्याख्याने तर द्यावयाची पण होता होईतो विचारपूर्वक व बंदिस्त द्यावयाची असेहि ठरले. व या व्याख्यानमालेला पुण्यातच ता. २४ सप्टेंबर रोजी सुरवात झाली. पहिले व्याख्यान संवाचे चिटणीस केळकर यानी किर्लोस्कर थिएटरात बॅ. बॅपटिस्टा यांच्या अध्यक्षतेखाली दिले. हेतू हा की संघाचे मुख्य अधिकारी अध्यक्ष व चिटणीस यानीच हा उपक्रम केला म्हणजे इतरानाहि ही व्याख्यानमाला मार्गदर्शक व आश्वासनपर होईल. दुसरे व्याख्यान स्वराज्यसंघ या विषयावर ता. १ ऑक्टोबर रोजी दादासाहेब करंदीकर यांचे व्हावयाचे. पण ते मद्रासेस गेल्यामुळे त्यानी लिहून पाठविले ते खाडिलकर यांचे अध्यक्षतेखाली गोखले यानी वाचून दाखविले. तिकडे मद्रासच्या बाजूला वेझन्टबाईचीहि व्याख्याने सुरूच होती. निरनिरा- ळ्या प्रांतातील नेमस्तपक्षानेहि यावेळी थोडीबहुत मदतच केली असे म्हणण्यास हरकत नाही. कलकत्त्यास शशांकजीवनराय यानी बाबू सुरेंद्रनाथ वानर्जी यांचे अध्यक्षते- खाली स्वराज्य या विषयावरच व्याख्यान दिले. सुरेंद्रबाबूनी स्पष्ट शब्दात सांगितले की काँग्रेसवाल्यांच्या शब्दानी बोलावयाचे तर स्वराज्य आणि बेझन्टबाईच्या शब्दानी बोलावयाचे तर होमरूल यांची प्राप्ती हिंदुस्थानाला युद्धानंतर झालीच पाहिजे. ता. ८ आक्टोबर रोजी सं. प्रांताची परिषद गोरखपूर येथे भरली तीत अध्यक्ष या नात्याने चिंतामणी यानीहि हिंदुस्थानावर इंग्लंडबरोबर वसाहतीचेहि अधिराज्य होऊ पाहत आहे ते आम्हाला खपणार नाही, स्वराज्याची पात्रता हिंदुस्थानात आहे, म्हणून स्वराज्याची मागणी सर्वस्वी योग्य आहे असे सांगितले. फिरून महा-