पान:लोकमान्य टिळक यांचे चरित्र -उत्तरार्ध खंड 3.pdf/१२०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

भाग २ हायकोर्टाचा निकाल ५३ आपल्या कार्याला कसा करून घेता येईल याकडे होता. खटला ही एका अर्थाने इष्टापत्ति होती. पैकी आपत्ति गेली व इष्ट उरले. तेवढे पदरात कसे पाडून घ्यावे याचा विचार त्यांच्या मनात खळबळू लागला. सुटकेनंतरच्या केसरीतला अग्रलेख स्वतः टिळकानीच लिहिला हे गुपित आम्ही त्यांच्या लेखांचा तिसरा खंड गतवर्षी काढला तेव्हा फोडलेच आहे. व आम्ही ते फोडले नसते तरो त्या अग्रलेखाचा नुसता मथळा वाचूनच हा लेख टिळकांचा असे कोणीहि निक्षून सांगितले असते. अग्रलेखाच्या मथळयात त्यांच्या मनातील खळवळीचे गमक नेहमी हटवून मिळे तसेच येथेहि घडले, हा मथळा 'टिळक सुटले पुढे काय ? असा प्रश्न - चिन्हांकित आहे. उद्गार चिन्ह व प्रश्न चिन्ह यातहि मनुष्याच्या भावनाच प्रगट होतात. उद्गार- चिन्ह हे निवृत्तीपर आहे. कारण दुःखाचा सुखाचा रागाचा लोभाचा आशेचा निराशेचा उपशम उद्गार हा असतो. त्यात पुढील कार्याची सूचना नसते. याच्या उलट वाचकाला हाक मारून उभे करून त्याच्या विचाराला जागृति देऊन पुढील काहीतरी प्रवृत्तीचा प्रसंग आहे अशी गुप्त सूचना प्रश्नचिन्ह करीत असते. या लहानशा सुटसुटीत मथळ्यात टिळक सुटले इतक्या पुरताच सुखाद्द्वार आहे. पण या सुटकेचा उपयोग ' लोकहो तुम्ही काय करून घेणार' असा टिळकानी टाकलेला प्रश्न पाहून टिळक आपल्या समोर उभे आहेत व त्याना काही तरी आश्वासनपर उत्तर दिले पाहिजे असे प्रत्येक वाचकाला त्यावेळी वाटल्याशिवाय राहिले नाही. टिळक म्हणतात " मी सुटलो ही माझ्या आयुष्यात महत्त्वाची गोष्ट. कारण पूर्वीच्या दोन्ही खटल्यात मला शिक्षाच झाली. मी कितीहि चळवळ्या असलो तरी आश्रममृगाप्रमाणे खरोखर निरुपद्रवी आहे हे न्यायकोर्टाने सरकारचा वाण परतवून यावेळी ठरविले. मृग पाहिला की धनुष्याला बाण जोडणे हा क्षत्रि- याचा धर्मच होय. आणि दुष्यंताच्या तपोवनातील दोघा ऋषिकुमारानी पुढे येऊन हात वर करून बाण परतविल्याचा प्रकार एकदाच घडला. पण सगळ्या हरिणाना रहावयाला अशी सुरक्षित तपोवने कोठून मिळणार ? आणि त्याच्याकरिता असे ऋषिकुमार तरी आयत्या वेळी कोठून धावून येणार ?” अर्थात् राजद्रोहाची मृगया म्हटली म्हणजे सरकाराने बाण मारावा हा त्यांचा धर्म आणि तो लागून पडावे हा लोकांचा धर्म. पण टिळक म्हणतात " हा विचार आपण आता टाकून देऊ आणि मुद्द्याकडे वळू. हायकोर्टाच्या ठरावाचा परिणाम प्रत्यक्षपणे माझ्यावरील पाशबंध काढून घेण्याचा दिसला तरी तो फार व्यापक व महत्त्वाचा आहे. अधि- कारी वर्गाचे दोष दाखवून टीका करणे हा पर्यायाने राजद्रोह होतो अशी समजूत अधिकाऱ्यानी आपली व लोकांची करून ठेवली होती. व ती या निकालाने जरी सोळा आणे दूर झाली नाही तरी सरकारच्या बाबतीत 'प्रीतीचा अभाव' असणे म्हणजे काही राजद्रोह नव्हे हे तरी कोर्टाने निश्चित ठरविले, पण हा बोध अधि- कारी घेवोत वा न घेवोत. आपण काय करावयाचे ? सुटका झाली. आनंद वाटला. पेढे खाल्ले. मनुष्यस्वभावाप्रमाणे क्षणभर उत्सव केला. पण नोकरशाहीचे जे दोष