पान:लोकमान्य टिळक यांचे चरित्र -उत्तरार्ध खंड 3.pdf/११९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

५२ लो० टिळकांचे चरित्र भाग २ करू शकेल. तात्पर्य हा प्रश्न तात्विक युक्तिवादाने सुटणारा नाही. विशिष्ट परिस्थि- तीत कोणाचा काय उद्देश होता हे पाहून निर्णय केला पाहिजे. केवळ एकच खाते घेऊन त्याच्यावरील टीका राजद्रोहात्मक असेल. उलट पुष्कळ खाती घेऊन त्यातील दोष दाखविले तरी तो एकंदरीने राजद्रोह होणार नाही. प्रस्तुत भाषणात टिळकानी राजाची निंदा केली असा आरोप नाही त्या अर्थी टिळ कानी राजाविषयी काही चांगले उद्गार काढले तरी ते जमेस धरण्याचे कारण नाही. हिंदुस्थानात कायद्याने जी राजसत्ता प्रस्थापित झाली आहे तिची राजद्रो- हात्मक निंदा झाली आहे किंवा काय इतकाच प्रश्न. मी ह्या प्रश्नाकडे टिळ- कांच्या एकंदर भाषणावरूनच पाहतो... ती समग्र वाचली असता त्यांचा स्वाभा विक परिणाम काय होईल इतकीच माझी दृष्टि आहे. मी ही सर्व भाषणे मुद्दाम लक्षपूर्वक बाचली. आणि त्यांचा समग्र विचार करणेच योग्य. म्हणून मी निर- निराळ्या वाक्यावर टीका करीत नाही. अशा प्रसंगी बोलणाराकडे धोडे झुकते सापच द्यावे लागते असे विलायतेतील न्यायमूर्तिचेहि मत आहे. टीकात्मक भाष णाचा विचार करताना थोडा खुलेपणा थोडा ढिलेपणा ठेविला पाहिजे. ह्या दृष्टीने विचार करता टिळकांचा हेतू असा स्पष्ट दिसतो की हिंदुस्थानाला होम- रूल मिळावे त्याविषयी लोकमत अनुकूल व्हावे व लोकानी स्वराज्यसघाला येऊन मिळावे. तसेच कोणत्याहि बेकायदेशीर मार्गाचा उपदेश टिळकानी केला नाही ही गोष्ट अगदी उघड आहे. 6 - "हिंदुस्थान दास्यात आहे राज्याधिकारी परकी आहेत असली विधाने स्वतः आक्षेपकारक म्हणता येतील. पण सबंध भाषण वाचले ऐकले असता ह्या तुटक विधानांचा परिणाम फारसा विपरित होणे शक्य नाही. सरकारी वकिलाचे म्हणणे असे की टिळकांच्या भाषणामुळे त्यांच्यावर १२४ अ ' कलमाचा गुन्हा लागू न झाला असे मानले तरी क्रि. प्रो. कोड १०८ कलमाप्रमाणे या भाषणा- वरून जामीन घेता येईल. पण मला तसे वाटत नाही. भाषण राजद्रोहात्मक आहे इतकी गोष्ट प्रथम दाखविता आली पाहिजे, १०८ कलमात तसे स्पष्ट सांगितले आहे. इतर रीतीने १०८ कलमाचा उपयोग असेल व आहे. पण राजद्रोहाच्या आरोपासंबंधाने पाहता तो गुन्हा घडण्यासारखे कृत्य झाल्याचे प्रथम गृहीत धरावे तरच त्यासंबंधाने ह्या कलमाचा उपयोग करिता येतो. " हायकोर्टाने टिळकाना दोपमुक्त ठरवून जामिनकी रद्द केली याबद्दल यच्च- यावत् वर्तमानपत्रानी टिळकांचे व हायकोर्टाचे सारखेच अभिनंदन केले. या आनं- दोत्सवाची खरी समाप्ति टाईम्स ऑफ इंडियाने केली. "मॅजिस्ट्रेटचा निकाल होताच आम्ही घाईने जी टीका केली ती आता आम्ही सर्वस्वी परत घेतली" असे टाईम्सने जाहीर केले! बाहरगावाहून आलेल्या अभिनंदनाच्या तारा व पत्रे यांचा ढीग पडला. व त्याबद्दल टिळकानी खासगी व जाहीर आभारप्रदर्शन केले. पण त्यांचे खरे लक्ष ह्या अभिनंदनाचे सुख सेवन करण्याकडे नसून या अनुकूल लाटेचा उपयोग