पान:लोकमान्य टिळक यांचे चरित्र -उत्तरार्ध खंड 3.pdf/११८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

भाग २ हायकोर्टाचा निकाल ५१ इंग्रजी राष्ट्राच्या देखरेखीखाली त्यांच्या मदतीने त्याच्या सहानुभूतीने त्यांच्यातील उच्च भावनाना जागृत करून हल्लीचा कायदा बदलून आणि तो पार्लमेंटातून बदलून घेऊन ( इतर राष्ट्राकडून नव्हे) पार्लमेंटला अर्ज करून टिळकाना आपले कार्य साधावयाचे आहे असे त्यांच्या भाषणात स्पष्ट दिसून येते. साम्राज्य राहो पण त्यातील सर्व भागांचा एकजीव झाल्याशिवाय ते खंबीर होणार नाही इतकेच टिळक म्हणतात. इतर वसाहतीतून जागृति झाली तशीच हिंदुस्थानातहि व्हावी इतकेच टिळकांचे म्हणणे. पण जागृति म्हणजे हाती तरबार घेणे असा अर्थ नव्हे. बेकाय- देशीर अशीहि गोष्ट आपणाला करावयाची नाहीं ही टिळकांची विधाने मी नमुन्यादाखल असे समजतो. आणि ह्या विधानावरून पाहिले तर राजद्रोह किंवा बेकायदेशीरपणा टिळकांच्या मनात ह्यावेळी नव्हता असे म्हणावे लागते. देशी संस्थानातील कारभारावरून सिद्ध होणारी हिंदी लोकाची पात्रता गोऱ्या अधि- कान्यांचा भारी पगार गोया अधिकाऱ्यांचा परकीपणा त्यांचे लोकस्थितीविषयीचे अज्ञान इत्यादि विषयी टिळकानी विधाने केली आहेत ती बरोबर असोत चूक असोत. पण १२४अ कलमातील ' टीका' ह्या शब्दाखाली ती येतात. ती केवळ निंदात्मक अगर बदनामीकारक नव्हत. "सरकारने काय केले हे न पाहता काय न केले हे सांगण्याचा टीकाकाराला अधिकार आहे असे टिळक म्हणतात आणि ते बरोबर आहे. दुर्दैवाने भाषणात असेच दोन तीन प्रसंग आहेत की त्या संबंधाने टिळकानी केलेली विधाने वाईट आहेत. बॅ. जिना ह्यानीहि फारसे त्याचे समर्थन केलेले दिसत नाही. आणि ती विधाने उद्धृत करून मी त्याना प्रसिद्धि देऊ इच्छित नाही. पण प्रश्न इतकाच की ह्या तुटक विधानावरून गुन्हा शात्रीत होतो की काय ? विधाने वाईट पण ज्या प्रकरणी ती केली ती आक्षेपाई नाहीत. निदान इतर जी रास्त विधाने टिळकानी केली त्यांचा परिणाम हटकून पुसून टाकण्याइतकी तरी वाईट खचित नाहीत. ह्या सर्व कारणाकरिता मी मॅजिस्ट्रेट कोर्टाचा हुकूम फिरवितो. " न्यायमूर्ति शहा ह्यांच्या निकालात टिळकाना दोषमुक्त तर ठरविलेच आहे. पण न्यायमूर्ति बॅचलर ह्यांच्या निकालापेक्षा त्यांचा निकाल अधिक व्यापक व उदारबुद्धीचा आहे. ते म्हणतात-"स्वराज्य हा शब्द व स्वराज्य मागण्याचा विषय हे स्वतः आक्षे- पार्ह नाहीत. ही गोष्ट सरकारतर्फे कबूल करण्यात आली आहे. अप्रीति शब्दाचा अर्थ स्ट्रॅची साहेबानी केला तो बरोबर नाही. आणि पुढे फुल बेंचच्या निकालात तो फिरवण्यातहि आला आहे. सरकार ह्या शब्दाच्या अर्थासंबंधाने वाद आहे. सर- कार व सरकारी अधिकारी यात बॅ. जिना ह्यानी फरक दाखविला आहे. एकेक खाते किंवा अधिकारी वर्ग निरनिराळा घेतला तर सरकार म्हणता येणार नाही. आणि त्यांच्यावर केलेली टीकाहि सरकारावर केलेली टीका असे म्हणता येणार नाही. तथापि अशी पुष्कळ खाती व असा पुष्कळ अधिकारी वर्ग जमेस धरून त्याच्यावर केलेली टीका अशी होऊ शकेल की तो सरकारविषयी द्वेषबुद्धि उत्पन्न