पान:लोकमान्य टिळक यांचे चरित्र -उत्तरार्ध खंड 3.pdf/११७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

५० लो० टिळकांचे चरित्र भोग तक्रार भाषण कडक झाले अशी आहे. पण भाषणात कोठे कोठे कडक शब्दांची योजना झाली असली तरी एकंदर भाषण आक्षेपार्ह आहे असे म्हणता येत नाही. पूर्वी न्यायमूर्ति स्ट्रॅची ह्यानी ' Dis-affection' म्हणजे अप्रीति ह्या शब्दाचा अर्थ प्रीतीचा अभाव असा केला आहे. पण माझ्या मते तो अर्थ बरोबर नाही. प्रीति किंवा आवड नसणे म्हणजे द्रोहबुद्धि आहे असा अर्थ इंग्रजी भाषेचे म जाणणारा कोणी म्हणणार नाही. स्टॅन्ची साहेबांचे हे मत पुढे फुल बेंचने खोडून काढलेलेच आहे. मनुष्याने मी राजद्रोही नाही किंवा राजनिष्ठ आहे असे वरचेवर म्हटले असता १२४ अ कलमाखालच्या आरोपाला उत्तर होऊ शकते की नाही असा एक प्रश्न आहे. माझ्या मते तसे होऊ शकत नाही. राजावर आपली निष्ठा आहे असे टिळकानी वारंवार म्हटले तरी समग्र भाषणावरून त्यांचा हेतू ठरविला पाहिजे. सिव्हिल सर्व्हिस म्हणजे सरकार नव्हे. म्हणून अधिकारी वर्गावरील टीका हा राजद्रोह नव्हे असा एक मुद्दा टिळकातर्फे मांडण्यात आला आहे. पण तोहि बरोबर नाही. सिव्हिल सर्व्हिस क्षेत्र राज्यकारभाराचे मुख्य साधन आणि तिच्या- विरुद्ध द्वेष उत्पन्न झाला असल्यास तसे म्हणता येईल. "पण ह्या दोन्ही मुद्यासंबंधाने इतकेच म्हणावयाचे की भाषण समग्र घेऊन विचार केला पाहिजे. स्वराज्य हवे असे म्हणण्यामध्ये टिळकांचा हेतू इतकाच दिसतो की प्रजेला राजकीय अधिकार अधिकाधिक मिळावयास पाहिजेत आणि इतकीच गोष्ट घेतली तर तीवरून राजद्रोह ठरत नाही. वाटेल त्या परिस्थितीत स्वराज्याची मागणी ही निर्दोष ठरेल किंवा तो गुन्हा होणार नाही असे मात्र मी म्हणत नाही. कारण स्वराज्य ह्या शब्दांचे अर्थ अनेक होऊ शकतात. पण टिळ- काना कोणच्या पद्धतीने हे स्वराज्य मिळावयास पाहिजे हे त्यांचे त्यानीच स्पष्ट केले आहे. म्हणूनच ह्या गोष्टीबरोबर टिळकांच्या राजनिष्ठेची विधाने घेतली असता ती मायावीपणाची किवा कृत्रिम असे मला म्हणता येत नाही. आता शब्दाचा परिणाम राजद्रोहकारक झाला तर तोहि गुन्हा होऊ शकतो. टिळकांच्या भाषणात असभ्यपणाचे व कडक असे उद्गार अनेक आहेत ही गोष्ट निर्विवाद होय. पण त्यावरून टिळकांचा स्वभाव रागीट आहे, त्याच्या अंगी सदभिरुची नाही एवढेच फार तर म्हणता येईल. मूळ विषय आक्षेपार्ह नाही असे एकदा ठरल्यावर भाष- णाचा प्रत्यक्ष परिणाम काय झाला एवढेच पाहणे उरते. भाषणातील निवडक शब्द व वाक्ये काढून उभयपक्षातर्फे आमच्यापुढे मांडण्यात आली आहेत. पण मी ती टाकून देतो व एकंदर भाषण वाचून त्याचा निर्विकारपणे विचार करितो. आणि त्यातील युक्तिवाद लक्षात घेता मला असे वाटते की राज्यपद्धतिविषयी नापसंती प्रगट करण्याचा टिळकांचा उद्देश खचित होता. पण द्वेष उत्पन्न करण्याचा खचित नव्हता. टिळकानी मागितलेल्या मागण्या किंवा पुढे आणलेले आक्षेप किंवा केलेला युक्तिवाद राजकीय दृष्ट्या बरोबर नसेल. तो चुकीचा असेल. पण त्यामुळे कायद्याचे उल्लंघन झाले की नाही इतकेच मला पाहावयाचे. इंग्रज लोकांच्या अमलाखाली