पान:लोकमान्य टिळक यांचे चरित्र -उत्तरार्ध खंड 3.pdf/११६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

भाग २ हायकोर्टाचा निकाल ४९ ण्याचा असतो. अर्थात राज्यपद्धतीचे दोष दाखवून अशी एखादी गोष्ट सांगणे यात द्वेषाचा उद्देश नसून अशा पद्धतीचे परिणाम काय होतात हे दाखवि ण्याचाच असतो ही गोष्ट न्यायमूर्तींना पटली. नंतर कौंसिलात खरे सत्य नाही ह्या टीकेवर मॅजिस्ट्रेटनी हरकत घेतली. ह्या गोष्टीविषयी न्यायमूर्तीनी थोडे आश्चर्य प्रगट केले. तेव्हा सरकारतर्फे तो मुद्दा काढून घेण्यात आला. इंग्रजाना येथे कोणी बोलाविले हा प्रश्न काही टिळकानीच प्रथम केलेला नव्हता पुष्कळ लोक वादात तसे म्हणतातच ही गोष्टहि पटली. श्रोतृवर्गीत शेतकरी वगैरे लोक पुष्कळ होते तेव्हा टिळकांचे हे भाषण ऐकून त्यांच्या मनावर काय परिणाम झाला असेल ह्याची चर्चा झाली. लोकाना पशुसारखे वागविण्यात येते ह्यासंबंधाची हरकत बॅरिस्टर जाडिन ह्यानी परत घेतली. जिना ह्यांच्या भाषणानंतर अॅडव्होकेट जनरल जारडिन वानी उत्तर दिले. त्यांचे भाषण चालू असता खात्यावरील टीका ही सरकारावरील टीका होते की नाही ह्याविषयी कोर्ट व बॅरिस्टर ह्यांच्यामध्ये बरीच भवति न भवति झाली. सिव्हिलिअन कसा वागतो ह्याचे वर्णन टिळकानी केलेले जारहिन ह्यानी वाचून • दाखविले. तेव्हा न्यायमूर्ति बॅचलर म्हणाल ही टीका का रास्त नाही ? तात्पर्य जॉरडन यानी एकेक आक्षेप मांडावा आणि तो परस्पर न्यायमूर्तीनीच थोडाबहुत खोडून काढावा असाच प्रकार बहुधा सुरू होता. यामुळे बचावादाखल फारसे बोलण्याचे जिना ह्याना कारणच पडले नाही. त्यानी इतकेच सांगितले की भाषणामध्ये कोट्या येतात लोक हसतात टाळ्या वाजवितात ह्या गोष्टी चालावयाच्याच. ह्याचा विपरीत अर्थ कोणी करू नये. लेखाची गोष्ट वेगळी व भाषणाची गोष्ट वेगळी. आणि लोक हसतात व टाळ्या वाजवितात ह्यावरून बोलणाऱ्याची हटकून द्वेषबुद्धि असते असे म्हणणे गैर आहे. जामीन घेणे ही गोष्ट सोपी दिसते. पण कुन्हा हातून घडला आहे असा अभिप्राय पडल्याखेरीज जामीन मागता येत नाही. जामीन हा काही पोरखेळ नव्हे. मी सुमारे ४० वाक्ये काढून अशी दाखवीन की त्यावरून द्वेषा- च्या उद्देशाचा हा आरोप सफशेल खोटा पडतो. तात्पर्य जिना ह्याना प्रत्युत्तर असे फार द्यावे लागले नाही. अशा रीतीने अपीलाची सुनावणी एकाच दिवसात संपली. आणि लगेच दुसऱ्या दिवशी ११॥ वाजता न्यायमूर्ति बॅचलर ह्यानी आपला निकाल सांगितला. न्यायमूर्ति शहा ह्यानीहि वेगळा निकाल लिहून आणला होता तोहि वाचून दाखविला. दोघाहि न्यायमूर्तीनी टिळक निर्दोषी आहेत असे ठरविल्यामुळे मॅजिस्ट्रेट यांचा हुकूम फिरून जामिनकी व मुचलका रद्द करण्यात आला. (८.) हायकोर्टाचा निकाल न्यायमूर्ति बॅचलर ह्यानी आपला निकाल दिला त्याचे तात्पर्य असे. " दिळ- कानी भाषण केले त्याचा सारांश व भाषांतर ह्याबद्दल वाद नाही. फिर्यादीची मुख्य टि० उ...११