पान:लोकमान्य टिळक यांचे चरित्र -उत्तरार्ध खंड 3.pdf/११५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

४८ लो० टिळकांचे चरित्र भाग २ गंभीर स्वरूपाची होती म्हणून तिच्यात लोकहित पुष्कळसे असले तरी धोकाहि - थोडासा होता अशी लोकांची समजूत होती हे सहज पाहावयास सापडले. टिळकांच्या व्याख्यानाना हजारो लोक ऐकायला येत. हरिदासाने आपले पालुपद आळवावे त्याप्रमाणे टिळकांनी परोपरीने लोकांना स्वराज्य संघात सामील होण्याची विनंति केली. गावात स्वराज्य संवाची कचेरी उघडी ठेवली असून वाटेल त्याने एक रुपया भरून सही करून आपले नांव सभासद म्हणून नोंदवावे असे केळकरानी जाहीर केले. तरी दोन दिवसात मिळून सुमारे १५ लोकावर सभासदांची संख्या गेली नाही ! आपल्या पायाने उठून कचेरीत जा रुपया भरा सही करून द्या एवढा खटाटोप तरी कोण करतो ? शिवाय चळवळीत काय आहे व काय नाही ह्याची कल्पना कोणास बरोबर नसल्याने चळवळीला प्रत्यक्ष स्पर्श न करिता बाजूबाजूने दुरून लोक कौतुकाने तिजकडे पाहात. पुढे आणि डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेटचा खटला झाल्यानंतर तर मग काही विचारावयासच नको. परंतु सुदैवाने हायकोर्टाने अपीलात टिळकाना दोषमुक्त करून सोडल्यामुळे ह्या सगळ्यांचा वचपा कसा निघाला हे कळून येईलच. तारीख २३ ऑगस्ट रोजी हायकोर्टात न्यायमूर्ति बीमन व हीटन ह्यांच्या पुढे बखले वकील यानी टिळकांचा अपील अर्ज गुदरला. आणि थोड्याशा वाद- विवादा नंतर अपील दाखल झाले. त्याची पक्की सुनावणी तारीख ८ नोव्हेंबर रोजी झाली. अपीलाचे काम बॅरिस्टर जिना बॅप्टिस्टा व एरूळकर हे चालवीत होते. प्रथम 'सरकार' व 'अप्रीति' ह्या शब्दांचा अर्थ काय त्याची चर्चा झाली. जिना ह्यांचे म्हणणे सरकार म्हणजे निरंतर चालणारी संस्था. त्यातील वरचेवर बदलणाऱ्या अधिकारी व्यक्तींचा समुदाय नव्हे. भाषणाच्या तात्पर्यविपयी फारशी चर्चा झाली नाही. हेतूसंबंधाने जिना ह्यानी सांगितले की सरकारतर्फे टिळकांचा हेतू द्वेपमूलक आहे हे सिद्ध झालेले नाही. व्याख्यानाच्या वेळी स्वराज्यसंघाची चळवळ सुरू झाली होती आणि स्वराज्यसंघ ही संस्था बेकायदेशीर नाही असे विनिंग ह्यानीच सांगितले होते. टिळकांच्या भाषणात सरकारची स्तुतीहि आहे. द्वेषी मनुष्य अशी स्तुति काय म्हणून करील ? राज्यपद्धति बदलू पाहणे हे काही द्वेषमूलक नव्हे. अधिकारी घमेंडखोर असतात. ह्यासंबंधाने बॅचलरसाहेब म्हणाले "जोडा पायात घालणारालाच जोडा कोठे लागतो हे कळते" असा टिळकांचा अर्थ असेल तर तो बरोबर आहे. इंग्रजी म्हणहि तशीच आहे. ' त्रयाणां धूर्तानां' ह्या गोष्टीसारखी गोष्ट शेक्सपिअरच्या एका नाटकात आढळते असे बॅचलर साहेवा- नीच सुचविले. सरकारी बॅ. जाडिन म्हणाले ' पण तसे म्हणणे सभ्यतेला सोडून आहे.' गुलामगिरी ह्या शब्दाचा अर्थ 'हक्क नसणे' इतकाच होतो हे जिना यांचे म्हणणे कोर्टाने मान्य केले. तेव्हा बॅचलर साहेब म्हणाले होय ' हम तुमारा गुलाम नही है' असे वाक्य व्यवहारातहि येते. इसाबनीतीच्या गोष्टीत शेवटी तात्पर्य दिलेले असते. त्या तात्पर्याचा अर्थ उद्देश रूप नसतो तर परिणाम दाखवि