पान:लोकमान्य टिळक यांचे चरित्र -उत्तरार्ध खंड 3.pdf/११४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

भाग २ राजद्रोहाचा तिसरा खटला 68 ४७ चळवळ सुरू केली आणि सरकारवर कडक टीका केली. त्यांत त्याना धोका किती आहे आणि किती नाही असे वाटत असावे याचा विचार पूर्वी केलाच आहे. सध्याच्या परिस्थितीत खटला होणार नाही हा त्यांचा अंदाज चुकला. पण खटला केला तरी त्याला उग्र स्वरूप राहणार नाही हा टिळकांचा अंदाज खरा ठरला. आणि केवळ जामीन घेण्याचा खटला जेव्हा भरण्यात आला तेव्हा अशा खटल्यासंबंधाची जी मुख्य भीति ती लोकांच्या मनातून गेली. जामीन घेतला असता व पुढे तो टिकला तर एक वर्षपर्यंत तरी टिळकांच्या तोडाला कुलूप लागेल आणि नव्या उपस्थित केलेल्या चळवळीवर घाला पडेल अशी भीति मात्र. लोकाना वाटली. कारण टिळकांच्या पासून जामीन घेतला म्हणजे ह्या चळवळीत पडणारे इतर लोक भाषणे करण्याचे थांबवतील असे कोणाला वाटले नव्हते. टिळकांचे वय लक्षात घेता टिळकांच्या पासून सरकारने नुसता जामीनच मागि- तला. पण इतर कोणावर ऐनजिनसी शिक्षेचे खटले न भरले जातील कशावरून ? किंबहुना तसे खटले भरले जातील असेच दिसत होते. आता हा धोका सोसण्याला स्वराज्य संघातील इतर मंडळी तयार नव्हती असे नाहीं. तर खटला होऊन तो सरकारसारखा झाल्याने एकंदर चळवळीवर एकप्रकारे राजद्रोहाचा छाप पडतो व सामान्य लोक चळवळीत सामील होण्याला भिऊ लागतात. जामीन घेतला किवा शिक्षा झाली यांत गुन्हेगाराच्या दृष्टीने फारसा फरक नाही. शिवाय शिक्षा एकवेळ पुरवते. कारण इतर नुकसान फारसे न झाल्यास वक्ता ती कशीही सोसतो. पण हजारो रुपयांचा जातमुचलका लिहून घेतला व जामीन दिला म्हणजे पैशाच्या नुकसानीचे जे बंधन उत्पन्न होते तेच एका दृष्टीने अधिक परिणामकारक व घातक ठरते. जामीन किती मागितला जावा ह्याला मर्यादा नाही. जातमुचकला रद्द झाला तर सगळे घरदार विकून कुटुं- बाचे कायमचे नुकसान होणार तेहि एकवेळ असो. पण कोणी बिचारे स्नेही म्हणून हमी देऊन जामीन उभे राहतात व त्यांच्यावर हजारो रुपयांच्या रकमा भरण्याची पाळी आली तर त्यांचे नुकसान कसे भरून द्यावे ? आणि ते कोण किती भरून देणार? अशा रीतीने शिक्षेपेक्षा जामीन अधिक जाचक होतो. स्वराज्यसंघाचा सभासद होण्याला फार अडचण नव्हती. एखाद दुसरा रुपया वर्गणी म्हणून द्यावा व धिटाईने ' होय मी ह्या संघाचा सभासद आहे' म्हणून सांगावे. ही गोष्ट सोपी दिसते. पण संघाचे अधिकारी व पुढारी यांच्यावर राजद्रोहाचा छाप पडला म्ह णून त्याने सर्व चळवळच्या चळवळ राजद्रोही ठरते आणि नुसता सभासद झाला तरी सरकार खटला करणार नाही कशावरून अशी भीति लोकांच्या मनात सहजच उत्पन्न होते. पण खटला प्रत्यक्ष होण्याची गोष्ट कशाला ? टिळकावर खटला झाला तो जुलै महिन्यात. पण त्यापूर्वी नगरास काय प्रकार झाला हे लक्षात घेतले म्हणजे उपजत बुद्धीने शिकवावे त्याप्रमाणे टिळकानी सुरू केलेली ही चळवळ काही तरी विशेष