पान:लोकमान्य टिळक यांचे चरित्र -उत्तरार्ध खंड 3.pdf/११३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

४६ लो. टिळकांचे चरित्र भाग २ ल्याचा निकाल तारीख १२ ऑगस्ट रोजी मॅजिस्ट्रेट यानी सांगितला. निकाला- तील काही भाग त्यानी वाचून दाखविला. आणि शेवटी फिर्यादीने मागितल्या- प्रमाणे पण थोडा कमी रकमेचा जामीन टिळकानी द्यावा असे सांगितले. शिवाय असे बजाविले की तुमच्यावर १२४ अ कलमाप्रमाणे ऐनजिनसी खटला न भरता म्हणजे प्रत्यक्ष शिक्षा देण्याचा खटला न भरता फक्त जामीन देण्याचा खटला भरला हे तुमचे भाग्य समजा ! आणि तुम्ही हल्लीसारखी वर्तणूक ठेऊ नये अशी तुम्हाला व तुमच्या स्नेह्याना इषारत देण्याचा सरकारचा हेतू आहे. खटल्याचा निकाल काय होणार ह्याची कल्पना होतीच. त्याप्रमाणे टिळ- कानी जामीन होणारे गृहस्थ हजर ठेविले होते. टिळकानी स्वतः वीस हजार रुप- यांचा जातमुचलका लिहून दिला. मॅजिस्ट्रेट मि. हॅच यांच्या लेखी निकालात मुख्य मुद्दा असा होता की “टिळकानी सरकार ह्याचे दोन भाग करण्याचा प्रयत्न केला. ते असे की (१) लोकाना दिसणारे सरकार व (२) लोकाना न दिसणारे. सरकार आणि दिसणाऱ्या सरकारच्या हातून होणाऱ्या गैरव्यवस्थेची उदाहरणे दिली. परंतु ह्या भेदात काही अर्थ नाही. पिनल कोडात सरकार हा शब्द वापरला आहे. त्यात लोकाना दिसणारे सरकार म्हणजे अधिकारी यांचाच समावेश होतो. आणि प्रत्येक खात्यावर व खात्याच्या अधिकाऱ्यावर जी सरसकट टीका केली आहे ती द्वेष पसरविणारी म्हणून राजद्रोहात्मक आहे. स्ट्रॅची साहेबांच्या निकालातील एक उतारा घेऊन जिना यानी असे दाखविण्याचा प्रयत्न केला की कायद्याने प्रस्थापित झालेले सरकार व त्याची राज्यपद्धति ही वेगळी आणि अधिकारीवर्ग हा वेगळा. पण टिळकांच्या भाषणातील निरनिराळ्या उताऱ्यांवरून असा भेद काढल्याचे स्पष्ट नव्हते. १२४ अ कलमात टीकेला परवानगी आहे पण ती कशी नसावी हेहि सांगितले आहे. स्ट्रॅची साहेबांच्या निकालातच त्याचा खुलासा आहे. तेव्हापासून आतापर्यंत राजद्रोह म्हणजे काय हे सर्वांना ठाऊक आहे. म्हणून त्या विषयाची चर्चा करण्याचे कारण नाही. कलमात ज्या गोष्टी करू नये म्हणून आहे त्या सर्व टिळकानी केल्या आहेत. तात्पर्य, सगळे भाषण समग्र लक्षात घेऊन व निर- निराळ्या तुटक शब्दाना महत्त्व न देता संकलित रीतीने ह्या भाषणाचा काय अर्थ होतो असेच मी निर्विकार मनाने पाहिले आहे. आणि ह्यावरून मला असे वाटते की लोकानी उठावे जागृति व्हावी राज्यपद्धति बदलून घ्यावी असा टिळकांचा उपदेश असून अज्ञानी लोकाना भलभलत्या गोष्टी त्यानी खुलवून सांगितल्या आहेत. टिळकानी ब्युरॉक्रसी हा शब्द मधून मधून वापरला आहे. परंतु त्यांचा कटाक्ष व टीका केवळ अधिकारीवर्गावरच नसून एकंदर राज्यपद्धति व एकंदर अधिकारीवर्ग यांच्यावर मिळून आहे. मग सरकार ते बाकी काय उरले ? टिळ कानी हे भाषण केले इतकेच नव्हे तर आणखीहि पुढे अशी भाषणे करणार असे जाहीर केले आहे म्हणूनच हा जामीन घ्यावा लागत आहे. " पूर्वी राजद्रोहाचे दोन खटले टिळकांवर झाले असता त्यानी ही नवी