पान:लोकमान्य टिळक यांचे चरित्र -उत्तरार्ध खंड 3.pdf/११२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

भाग २ राजद्रोहाचा तिसरा खटला ४५ श्रोते जमलेले व पुष्कळसे त्यातले अज्ञानी. अवघड गोष्ट सोपी करून सांगताना उदाहरणे व दाखले द्यावेच लागतात. पण हे दाखले व ही उदाहरणे शब्दशः कोणी घेत नाही. ब्रिटिश लोकाकडून ब्रिटिश अमलाखाली बादशहाची सत्ता कायम ठेऊन होमरूल मिळवावयाचे असे टिळकानी वारंवार बजाविले. त्यानी तक्रार केली ती फक्त अधिकारी वर्गासंबंधाने सरकार हा शब्द मधून मधून आला तो सिव्हिल सव्हिसला उद्देशून आला होता. लोक अडाणी त्याना सिव्हिल सर्व्हिस म्हणजे काय हे कसे कळणार ? सिव्हिल सर्व्हिस किंवा गुठ पोलिस खाते म्हणजे काही सरकार नव्हे. १२४ अ कलमामधील सरकार ह्या शब्दात गुप्त पोलिस खात्याचा खचित समावेश होत नाही. राज्यकारभारावर टीका करावयाची तर खात्यांच्या कारभारावर व खात्यांच्या अधिकारावर टीका केलीच पाहिजे. गुप्त पोलिस खाते हेच जर उद्या सरकार ठरले तर त्या सरकारला नमस्कार असो ! वाघ मारावयाचा झाला तरी सरकारची परवानगी लागते. पण ही स्थिति बदलली पाहिजे हे म्हणण्यात चूक कोणती ? स्थित्यंतर व्हावे असे टिळक म्हणतात आणि तेहि हळूहळू आणि जे होणार तेहि पार्लमेंटामार्फत घडवून आणावयाचे असेच टिळक म्हणतात. पोलिसाना भिऊ नका या म्हणण्यात राज- द्रोह नाही. बोलताना एखादा शब्द कडक बोलू नये किंवा कोणाच्याहि मर्मी लागू नये असे कसे होईल ? ' त्रयाणां धूर्तानाम्' ही गोष्ट युनिव्हर्सिटी बिलाच्या वादात डॉ. भांडारकर सारख्यानी उपयोगात आणली होती. ती सांगण्याचा टिळकांचा हेतू हा की काही लोक भ्रम उत्पन्न करितात दिशाभूलं करितात तशी लोकानी करून घेऊ नये. अमुक दिवसानी स्वराज्य द्या अशी मागणी का करू नये ? फिलिपाइन लोकाना अमेरिकेने अमुक दिवसात स्वराज्य देऊ असेच सांगि- तले होते. राणी सरकारचा जाहीरनामा बाजूला पडला आहे ही गोष्ट खोटी आहे काय ? आपण हिंदुस्थानात परकी आहो गोष्ट लॉर्ड क्रोमर आस्किथ इत्यादि- हवा सोडून वाईट हवेत येतो असे कानीहि कबूल केली आहे. आम्ही चांगली अधिकारी म्हणतात, तर तुम्ही का येता असा प्रश्न सहजच विचारावा लागतो.. आणि 'हिंदी लोक अपात्र म्हणून आम्ही येतो' या उत्तराला देशी संस्थानांचे. उदाहरण टिळकानी योग्य तेच दिले. गिरणीच्या कापडावर सरकार जकात बसविते यावरून व्यापारविषयक त्यांचे धोरण कसे आहे हे दिसत नाही काय ? देव पाहिजे पुजारी नको ह्याचा अर्थ सिव्हिलिअन लोकाकडे सर्व सत्ता नसावी इतकाच. गोरे लोक गोरे म्हणून नकोत असे टिळकांचे म्हणणे नाही. राज्यपद्धति अशी आहे की तीत गोरे लोक येतात. म्हणून पद्धतीवर टीका तीच गोया अधिकाऱ्यांवर होते. आपण १४ व्या शतकात नाही तर १९ व्या शत- कात आहो. म्हणून अधिकार मागतो असे टिळकांचे म्हणणे. तात्पर्य एखादे वाक्य एखादा शब्द घेऊन 'हा पहा राजद्रोह' असे म्हणत सुटणे योग्य नाही. ". याप्रमाणे दोन्ही भाषणे होऊन थोडक्यात खटल्याचे काम संपले, खट-