पान:लोकमान्य टिळक यांचे चरित्र -उत्तरार्ध खंड 3.pdf/१११

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

४.४ लो० टिळकांचे चरित्र भाग २ हे लक्षात ठेवा. स्टेट सेक्रेटरीला सरकारचे जावई म्हणण्याइतका काही तो अनि- यंत्रित नाही. वेळगावच्या भाषणापेक्षा नगरचे भाषण अधिक वाईट होते. ज्या वाक्याना लोकानी टाळ्या दिल्या त्याच वाक्यानी सरकारविषयी अप्रीति उत्पन्न झाली असे मी म्हणतो. गेल्या ५० वर्षात उद्योगधंद्याची भरभराट होत असता टिळक म्हणतात सरकारने ते बुडविले, सरकारी नोकरी करू नका असा टिळक उपदेश करितात. आज लोकाना पशुसारखे वागविले जाते म्हणजे काय ? टिळकानी सी. आय. डी. विरुद्ध तोंडसुख घेतले आहे. टिळकांची चळवळ होमरूलची असो वा नसो. पण ते एखादि चळवळ करितात म्हणून त्याना कोर्टात खेचलेले आहे असे नाही तर त्यांचे भाषण राजद्रोहात्मक आहे म्हणून आपला कारभार आपण चालविण्याचे ध्येय लोकापुढे ठेवण्यात चूक नाही. पण ते करिताना सरकारविरुद्ध द्वेष काय म्हणून पसरवावा ? शेवटी विनिंग म्हणाले की टिळक हजर असता आपल्या भापणाचा अधिक खुलासा स्वतः त्यानी करावयास पाहिजे होता. तसे न करिता त्यानी तो सर्व भार आपल्या बॅरिस्टरावर टाकला आहे. ( यावर जिना म्हणाले “खुलाशाचे सर्व काम मजवर सोपवा असे मीच त्याना सांगितले होते. " ) विनिंग यांचे भाषण तारिख ९ चा काही भाग व तारिख १० चा काही भाग एवढ्यात संपले. नंतर टिळकांच्या तर्फे बॅरिस्टर जिना यांचे भाषण सुरू झाले. ते म्हणाले " टिळकांच्या भाषणात अधिकारी वर्गावर टीका आहे. आणि मला आता भाषण करावयाचे ते अशा वर्गातील एकापुढेच होय. पण ही गोष्ट मॅजिस्ट्रेट लक्षात घेणार नाहीत व न्यायबुद्धीच ठेवतील अशी मला आशा आहे. लघुलेखकाना मुद्दाम पाठविले तेव्हा आपणाला कशाकरिता पाठविले तर टिळकाना शब्दात पकडावयाला पाठविले अशी त्याची समजूत सहजच झाली असेल. आधी भाषण लघुलिपीत उत- रून घेतले. आणि त्यानंतर त्याचे मराठीतून भाषांतर झाले. यामुळे मूळ टिळ- कांच्या अर्थाचा कितीतरी विपर्यास झाला असेल. लघुलेखकानी शब्द सोडले आहेत. भाषांतरात काही शब्द चुकले आहेत हे कबूल झाले आहे. राजद्रोहात्मक म्हणून एक शब्द येथला एक शब्द तेथला असे घेतले आहेत. सबंध भाषण लक्षात घेतले पाहिजे. आणि ते घेतले तरी द्वेष किंवा असंतोष उत्पन्न करण्याचा हेतू नसून कायदे- शीर मार्गाने राज्य बदलून घेण्याचा टिळकाचा उद्देश स्पष्ट दिसतो. क्रि. प्रोसीजर कोड कलम १०८ या अन्वये जामीन मागण्याचा खटला भरला यावरूनच पुढील भाषण थांबविण्याचा सरकारचा उद्देश. तेव्हा झाल्या गेल्या गोष्टी म्हणून पूर्वीच्या शिक्षा लक्षात घेणे योग्य नाही. कदाचित् पूर्वीचे भाषण राजद्रोहाचे होते असेच आपण समजा. तरीपण आजच्या व पुढच्या भाषणाचे धोरण टिळकांचे काय असेल याचाच मुख्य विचार कर्तव्य आहे. भाषणाची परिस्थिति लक्षात घेतली असता ' होमरूल' सारख्या चळवळीकरिता टिळक तीच ती गोष्ट वेगवेगळ्या रीतीने सांगत होते. आणि त्याना ती तशी सांगावी लागली याचे कारण हजारो