पान:लोकमान्य टिळक यांचे चरित्र -उत्तरार्ध खंड 3.pdf/११०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

भाग २ राजद्रोहाचा तिसरा खटला ४३ की नाही ? किंवा सरकारला येथे चोर म्हटले आहे ? वगैरे प्रमाणे मुद्दे ह्या उलट तपासणीत होते. तारीख ९ रोजी उलट तपासणी संपून टिळकांची जबानी घेण्यात आली. तीत त्यांनी सांगितले की 'स्वराज्य' किंवा 'होमरूल' ह्या विषयावर मी व्याख्याने दिली. भाषणाचा रिपोर्ट एकंदरीने सर्वसाधारण रीत्या बरोबर आहे. पण काही वाक्ये गळली आहेत व काही अपुरी आहेत. होमरूल समजावून देणे, लोकाना संघाचे सभासद व्हा म्हणून सांगणे हा माझ्या भाषणाचा उद्देश होता. होमरूल म्हणजे काय हे थोड्या शब्दांत स्पष्ट करून सांगता येणे शक्य नाही. आणि ते तसे नाही म्हणूनच इतके विस्तृत भाषण केलेले आहे. मला पूर्वी दोन वेळा राजद्रोहाबद्दल शिक्षा झाल्या ही गोष्ट खरी आहे. हल्लीच्या आरोपाबद्दल माझे सर्व म्हणणे माझे बॅरिस्टर मांडतील. टिळकांच्या जबानीनंतर जिना यानी असे सांगितले की मला टिळकांच्या तर्फे म्हणून काही एक पुरावा द्यावयाचा नाही. तेव्हा सरकार तर्फेचे बॅरिस्टर बिनिंग ह्यानी आपले भाषण सुरू केले. ते म्हणाले " काही भाषांतर चुकले आहे असे म्हणण्याचा जिना यांचे उलट तपासणीवरून रोख दिसतो. पण स्वतः त्यानीच सुचविलेले इंग्रजी शब्द घेतले तरी फारसा फरक पडत नाही. ' Slavery ' म्हणजे 'दास्य' ह्या शब्दावरून हिंदी प्रजा ही गुलामगिरीत आहे असे म्हणण्याचा टिळ- कांचा उद्देश उघड दिसतो. धूर्त ह्या शब्दाने टिळकांनी सरकारला असन्मान्य ठरविले. होमरूलचे ध्येय कायदेशीर असेल वा नसेल, पण टिळकांच्या भाषणां- वरून सरकारविषयी अप्रीति द्वेष व तिरस्कार उत्पन्न होतो असे माझे म्हणणे. टिळकांना पूर्वी शिक्षा झाल्याचा पुरावा दाखलच आहे. यावरून त्यांना अशी भाषणे करण्याची संवयच लागून गेलेली दिसते. कितीही शिक्षा झाल्या तरी त्याची याना फिकीर वाटत नाही. म्हणून काहीतरी प्रतिबंधक उपाय केला पाहिजे. नाही- तर आणखी वाईट भाषणे करीत जातील. एखादा अधिकारी वाईट आहे हे म्हणणे सयुक्तिक. पण सगळेच कलेक्टर सगळेच कमिशनर वाईट म्हणणे म्हणजे काय ? टिळकांचा होमरूलचा किंवा स्वराज्याचा एखादा मसुदा पुढे आलेला नाही. टिळकांच्या भाषणांतील थट्टा विनोद कोट्या यांत वक्तृत्व दिसेल. पण त्यांत स्वराज्याची व्याख्या नाही. भाषणात त्यानी स्वराज्य म्हणजे काय असा प्रश्न उपस्थित केला पण त्याचे उत्तर मात्र समर्पक दिले नाही. अधिकारी घमेंडखोर स्वार्थी असे म्हटल्याने त्यांच्याविषयी अप्रीति उत्पन्न होत नाही काय ? ह्या राज्यात गोरा मनुष्य व टिळक ह्याना सारखाच हक आहे. (ह्या विधानाला जिना ह्यानी हरकत घेतली आणि तसे नाही म्हणून सांगितले. ) टिळकांचे व्याख्यान मी ऐकले असते व मी हिंदी मनुष्य असतो तर त्यानी दिलेल्या खोट्या समजूती ऐकून माझ्याहि मनात सरकारविषयी अप्रीति उत्पन्न झाली असती. पसंतीबद्दल टिळकाना टाळ्या व नापसंतीबद्दल सरकारला 'शेम शेम' असा प्रकार भाषणातून सुरू होता