पान:लोकमान्य टिळक यांचे चरित्र -उत्तरार्ध खंड 3.pdf/१०९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

४२ लो. टिळकांचे चरित्र भाग २ एखादे वाक्य ' ब्रिटिश सरकारने हिंदुस्थानास कायमचे दास्यात ठेवले आहे ' किंवा ' नामधारी साम्राज्यसत्तेशिवाय सर्व ब्रिटिश सत्ता शक्य तितक्या लवकर नाहीशी केली पाहिजे' असले दिसण्यात जहाल कडक असले तरी दुसरी काही अशी होती की त्यात राजद्रोह कसा हुडकावा याची नवी शाळाच काढावी लागेल. उदाहरणार्थ 'व्हाइसरॉय व इतर अधिकारी याना जास्त पगार देण्याचे कारण एव- ढेच की तो परभारे हिंदुस्थानच्या तिजोरीतून मिळतो. अधिकारीवर्गाचा पहिला हेतू हा असतो की त्यांचा पगार बिनबोभाट मिळावा. सध्याची वेळ हिंदुस्थानास होमरूल मिळविण्याकरिता चळवळ करण्यास योग्य आहे' इत्यादि वरील वाक्ये सांगून देऊन विनिंग यानी अशी तक्रार केली की एकंदरीने भाषणातून टिळकानी बाद- शहांची इच्छा व हिंदुस्थानातील प्रत्यक्ष राज्यव्यवस्था यांत मोठे अंतर दाखविले आहे. तत्वतः टिळकांची ही खरी होमरूलची चळवळ नाही. तर फक्त सरकार- विरुद्ध द्वेषबुद्धि पसरविण्याकरिता ते भाषणे करीत असतात. यानंतर सरकारी लघुलेखक त्र्यंबक भिकाजी दात्रे यांची साक्ष झाली. त्यानी आपल्या लघु लेखनाच्या वह्या कोर्टात हजर केल्या. नंतर ठाकूर या नावाचे ओरिएंटल ट्रान्सलेटरच्या कचेरीतील एक नोकर यांची साक्ष झाली. ह्यानी भाषांतर केले नव्हते पण तपासले होते. टिळकाना पूर्वी राजद्रोहाची शिक्षा झाल्याचा पुरावा दाखल करावा अशी विनंति बिनिंग यानी केली. जिना ह्यानी त्याला हरकत घेतली. परंतु तो पुरावा मॅजिस्ट्रेट यानी दाखल करून घेतला. तारीख ८ रोजी साक्षीदारांच्या उलट तपासण्या झाल्या. दात्रे ह्यांनी सांगि- तले की मी १००-१२० पर्यंत शब्द लघुलिपीत दर मिनीटाला उतरून घेऊ शकतो. साधारण माणसे ११० शब्द तरी मिनीटाला बोलतात. टिळक सावकाश बोलतात. त्यांचे शब्द ७०-९० असे पडतात. काही ठिकाणी रिपोर्टात खुणा केलेल्या आहेत. 'राज' व 'राज्य' या शब्दात मी लिहिताना भेद करीत नाही. ठाकूर यांची उलट तपासणी वास्तविक टिळक यानीच स्वतः करावयाची. कारण त्यात मराठी शब्दांच्या इंग्रजी भाषांतराचा प्रश्न येत होता. हायकोर्टपेक्षां पुण्याच्या कोर्टात ही गोष्ट अधिक सुलभ व सहज होती. पण १९०८ साली टिळक स्वतः खटला चालवीत होते आणि ह्या खटल्यात त्याना जिना सारख्या बॅरिस्टरांच्या तंत्राने चालावयाचे होते. पण एकंदरीने भाषांतरकाराच्या उलट तपासणीतून विशेष काही निष्पन्न होण्यास जागा नव्हती. 'अडविणे' ह्याचे भाषांतर ' Obstr- uct' असे करावे का Stop Impede Hinder असे करावे ? ' ब्युरॉ- क्रसीला धक्का देणे' ह्याचे भाषांतर कसे करावे ? 'सरकार' ह्या शब्दाचे भाषांतर Government का Bureaucracy ? घमेंड ह्याचे भाषांतर Conceit असे करावे का Over confidence असे करावे? धूर्त म्हणजे Rogue की Cunning? Slavery व Servility या शब्दात भेद आहे की नाही ? पशु म्हणजे Beast की Cattle ? ' सगळी रात्र जागून चोर येण्याच्या वेळी निजणे ' ही म्हण आहे