पान:लोकमान्य टिळक यांचे चरित्र -उत्तरार्ध खंड 3.pdf/१०८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

भाग २ राजद्रोहाचा तिसरा खटला ४१ पुण्यास केळकरांचे व्याख्यान झाले त्या दिवसापासून स्पेशल रिपोर्टर पाठ- विण्यास सरकारने सुरवात केली असल्याचे वर सांगितलेच आहे. पण त्यापूर्वीच टिळकांचे भाषण समग्र उतरून घेण्याचे सरकारने ठरविले होते. आणि बेळगावास झालेल्या त्यांच्या भाषणाच्या वेळी सरकारी रिपोर्टर हजर होते तरी ती गोष्ट नेह- मीच्यातलीच असे लोकाना वाटले. पण त्या भाषणाचा रिपोर्ट सरकारकडे गेल्या- पासूनच टिळकांवर खटला करण्याचा विचार सरकारने सुरू केला असावा असे दिसते. तारीख २० जुलैपर्यंत सरकार ह्या गोष्टीचा विचार करीत होते. कोणी म्हणत गव्हर्नरसाहेबांच्या कौंसिलातहि याबद्दल दुमत होते. कित्येकांच्या मते लॉर्ड वुइलिंगडन हे खटला करण्याच्या विरुद्ध होते कारण स्वराज्य देण्याचा जाहीर- नामा बादशाहानी मर्यादित का होईना पण लवकर प्रसिद्ध करावा असा आग्रह त्यानी वरिष्ठ सरकारकडे धरला होता. कसेहि असो. तारीख २२ जुलै रोजी डेप्युटी इन्स्पेक्टर ऑफ पोलिस मि. गायडर यानी पुण्याचे डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट मि. हॅच ह्यांच्यापुढे टिळकांविरुद्ध फिर्याद दाखल केली. तीत त्यानी असे लिहून दिले की टिळकांची बेळगाव व अहमदनगर येथे झालेली भाषणे कलम १२४ अ खाली येण्यासारखी म्हणून राजद्रोहात्मक आहेत. टिळकाना पूर्वी दोन वेळ राजद्रोहाची शिक्षा झाली आहे. तरी अशा प्रकारची भाषणे त्यानी हल्ली सुरू केली आहेत. आणि पुढेहि तशीच करीत राहतील अशी धास्ती आहे. म्हणून त्यांच्यावर खटला करून मोठा म्हणजे ५० हजारांचा तरी जामीन मागण्यात यावा. टिळक स्वतः संपन्न व वजनदार आहेत. त्यांचे स्नेहीहि सधन आहेत. वाढदिवसानिमित्त उद्या त्याना एक लक्ष रुपयांचा अहेर करण्यात येणार आहे. अर्थात् इतका मोठा जामीन त्यांच्याजवळ मागण्याला हरकत नाही. त्यावर मि. हॅच ह्यानी टिळकांवर त्याच दिवशी नोटिस काढली. तीत “एक वर्षपर्यंत चांगली वर्तणूक ठेऊन शांतता राखण्याची हमी म्हणून तुम्ही २० हजारांचा जातमुचलका आणि दहा दहा हजा- रांचे दोन जामीन का देऊ नयेत ? याचे कारण समक्ष येऊन कळवा" असा मज- कूर होता. सुनावणीची पहिली तारीख २८ जुलै नेमली होती. म्हणून ती पुढे ढकलून घेण्याकरिता टिळकांच्यातर्फे अर्ज करण्यात आला. त्यावरून २ ऑगस्ट ही तारीख धरली. पण प्रत्यक्ष काम ७ ऑगस्ट रोजी सुरू झाले. कोर्टात स्वतः टिळक व त्यांच्यातर्फे बॅरिस्टर जिना एरूळकर बॅपटिस्टा तसेच करंदीकर बखले व काका पाटील वगैरे अनेक वकील मंडळी हजर होती. सरकारतर्फे बॅरिस्टर पटवर्धन व विनींग काम चालवीत असून सरकारी वकील दावर व फिर्यादि गायडर त्यांच्या मदतीला होते. प्रथम जिना ह्यानी विनंति केली की फिर्याद नक्की कोणत्या भाषणातील कोणत्या विधानाबद्दल आहे याचा स्पष्ट खुलासा सरकारी बॅरिस्टरानी करावा. तेव्हा बिनिंग ह्यानी निरनिराळी वाक्ये खुणा करून वाचून दाखविली. त्यात टि. उ...१०