पान:लोकमान्य टिळक यांचे चरित्र -उत्तरार्ध खंड 3.pdf/१०७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

४० लो० टिळकांचे चरित्र भाग ३ शंभरातले १० दिले तर अर्थात आभार मानणे ही मनुष्यवृत्तीच आहे. ती सुटत नाही व सोडूहि नका. पण महत्त्वाकांक्षा हीहि मनोवृत्तीच आहे. त्या एका मनोवृत्तीच्या पायाकडे सर्व मनोवृत्ती वाकविल्या पाहिजेत. याच उद्देशाने आझी स्वराज्यसंघ काढला आहे. 66 'आताच येथे केळकरानी माझे हातात कागद दिला त्यावरून मद्रासेस बेझंटवाईनी होमरूल लीग काढल्याचे लिहिले आहे. उद्या बंगाल्यातहि निघेल. उद्या काँग्रेस हो स्वतःचा असा होमरूल मागण्यापुरता स्वतंत्र संघ काढील. नाही कशावरून ? अधिकारसंक्रमणाचाच हा काल आहे. विलायतेत हाऊस ऑफ लॉर्डसचे अधिकार जाण्याची वेळ तशीच हिंदुस्तानात गोया अधिकाऱ्यांच्या हातून सत्ता जाण्याची वेळ का येऊ नये ? हळूहळू ती सर्व देशभर झाली पाहिजे. येथेच काय विलायतेतहि जाऊन आमचे हेतू सांगितले पाहिजेत. मागणी मागितली पाहिजे. हल्लीचा गव्हमेंट ऑफ इंडिया अॅक्ट दुरुस्त करण्याचे बिल आणले पाहिजे. पूर्वी १८५८ साली या कायद्याची एक दुरुस्ती झाली आज दुसरी. या योजनेत मवाळ जहाल सर्वानी एक दिलाने सामील झाले पाहिजे. स्वराज्यसंघ तुमच्यापासून अधिक काय मागतो ? वार्षिक वर्गणी किती थोडी ठेविली आहे. १०-२० वर्षे द्यावी लागली तरी फार नाही. तुम्ही लोकानी संघाचे ध्येय उद्देशपत्रिका मान्य करावी आणि लहानशी वर्गणी द्यावी. बाकीची चळवळ तुमच्याकरिता इतर करण्याला सिद्ध आहेत. पोलिस विचारतील स्वराज्य संघाचे सभासद झाला काय ? त्याला स्पष्ट सांगा हो झालो. त्यात राजद्रोह नाही. खटला झाला तरी चालवावयाला वकील फुकट मिळतील. तुम्ही व्यापारी लोक गोरक्षणाकरिता वर्गणी बाजूला काढून ठेवताच तशी ह्या चळवळीकरताहि ठेवा. त्या धर्मदायाच्या आण्यापैकी एक पैसा अर्धा पैसा आमच्या चळवळीला तुझी का देऊ नये ? एक पावशेरभर दुध देणारी ती तेवढी तुमची गाय आणि 'हिंदुस्थान' ही गाय नव्हे वाटते ? स्वदेशरूपी पृथ्वी ही गायच आहे. मानवी गोपुल तिचे रक्षण करणार नाहीत तर त्याना बैल म्हणून घ्यावे लागेल ! आमच्या संघावर संकटे आली तर सोस- याला आम्ही तयार आहोत व ती सोसलीही पाहिजेत. " या व्याख्यानाला ९ | वाजता सुरवात झाली होती. टिळक शिणलेले होते तरी त्यानी दोन तास भाषण केले. लोक चित्रासारखे तटस्थ होते. टिळकांच्या कोट्या विनोद व खटके यानी मात्र ते मधून मधून हलविले जात. व्याख्यानाच्या शेवटी संगमनेरचे देशपांडे नगरचे चौकर कऱ्हाडचे अळतेकर इत्यादिकांची भाषणे होऊन व्याख्यान समारंभ संपले. आदल्या दिवशी नगरास स्वराज्यसंघाची कचेरी उघडण्यात आली असून सभासद मिळविण्याचे काम सुरू झाले होते. पण दोन दिवसाहून नगरास अधिक मुक्काम करण्याची सवड नसल्याने व जिल्हा परि- षदेचे काम आवरल्यामुळे टिळक केळकर व इतर मंडळी तिसन्या दिवशी पुण्यास परत फिरली.