पान:लोकमान्य टिळक यांचे चरित्र -उत्तरार्ध खंड 3.pdf/१०५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

३८ लो० टिळकांचे चरित्र भाग २ कागद खालवर पत्रव्यवहारात खचीं घालावे लागतात. हे अधिकार आम्ही कोणा- एका व्यक्तीकरिता मागत नाही. सगळ्या जनतेकरिता मागतो. सगळी जनता नाला- यक व सगळे अधिकारी तेवढे शहाणे! ते करतील तितकेच बरोबर ! अधिक करा म्हटले 'नाही.'वेगळ्यारीतीने करा म्हटले 'नाही.' पण अधिकाऱ्यांना तरी काय बोल? आमच्या लोकाना तरी हे अजून कोठे पटले आहे ? पिंजऱ्या बाहेरचा पक्षी जर म्हणाला की " अरे बाहेर मोकळी हवा मिळते, हवे ते खाद्य मिळते, हवे तसे हिंडायला मिळते किती मौज आहे ? " तर त्याला अजून पिंजन्यातला पक्षी म्हणतो " हे सगळे खरे, पण मोकळ्या हवेत मला येथल्यासारखी सोन्याची काठी बसण्याला कशी मिळणार ?” १०० वर्षांच्या पारतंत्र्याने आम्ही पिंजऱ्यातल्या पोपटा- सारखे झालो आहो. परकी सत्ता चांगली ही काही आम्हा लोकांची स्वाभाविक भावना नाही. आम्ही आपल्या पूर्वजांचे वंशज तर त्यांच्यासारखे होऊ अशा आकांक्षेने पूर्वोद्धारणेचा उद्योग केला पाहिजे, आमचे सरदार पूर्वजांची वतने खातात आणि साहेबांची स्तुति करतात ! तुमचे आजे सरदार होते मग तुमच्या अंगातले वडिलार्जित गुण गेले कोठे ? सरदारकीची धमक राहिली पण जुने ब्राह्मण चंद्राला ग्रहण लागले म्हणजे थोडेसे दान तरी करीत होते. तितका स्वार्थत्याग हि करण्याला आम्ही तयार नाही. हिंदुमुसलमान हा भेदभाव शिकविणाराचीहि भर यातच पडली आहे. बरे हिंदु व मुसलमान एक झाले तर तिसऱ्या कोणाची तरी हरकत ते दाखविणारच ! एकूण ' त्रयाणां धूर्तानाम्' ह्या गोष्टीतल्याप्रमाणे आमची फसवणूक चालू आहे. आधी ज्ञान नाही. ज्ञान असले तर निश्चय नाही. निश्चय असला तर धैर्य नाही. टिळकांच्या व्याख्यानाला गेला होता काय ? असा साहेबाने प्रश्न विचारला तर असे म्हणणारे लोक निघतात की 'होय गेलो होतो. पण लांब बसलो होतो. सगळे काही नीटसे ऐकू आले नाही.' आणि मग साहेबाच्या मागे सर्व काही खरे सांगतील ! टिळकांच्या व्याख्यानाला गेलो होतो असे म्हणण्याचेच काय पण आम्हाला स्वराज्य पाहिजे असे म्हणण्याचेहि धैर्य अंगी पाहिजे. स्वातंत्र्याची देवता मोठी चाणाक्ष आहे आणि ती तोंडाने लपविले तरी मनातले हुडकून काढते. पण मनातील तोंडाने स्वतः बोललेले तिला खपत नाही. भूताना भ्यायले नाही तरच मांत्रिकाना सिद्धी मिळते. 'अंधारातून गेल्याशिवाय उजेड कसा दिसणार ? ' ही इंग्रजी म्हण लक्षात ठेवा. सामान्य लोक समजतात की अंधारातून बाहेर पडतो तेव्हाच सूर्य उगवतो. पण तुम्हाला प्रयत्नाशिवाय फळ पाहिजे. कधी ईश्वर फुकटाफुकटी यश देत नाही. आणि त्याने चुकून फुकटाफुकटी ते पाठविले तर तुम्ही त्याला ते परतहि करावयाचे इतकी यशाची तुम्हाला भीति ! आज सुदैवाने संधि आली आहे. आणि इतर लोकाप्रमाणे आम्हीहि केवळ प्रजेचेच हक्क मागू तर ते चालेलहि. पण तुम्ही लोक असे आहा की एरवी खूप जागे. पण चोर घरात शिरण्याचे वेळी मात्र निजलेले, प्रजेचे हक्क मागण्यात आम्ही कोण- त्याहि खात्याचा दुःस्वास करीत नाही. स्वराज्य मिळाले तर आम्हालाहि ही संघ-