पान:लोकमान्य टिळक यांचे चरित्र -उत्तरार्ध खंड 3.pdf/१०४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

भाग २ राजद्रोहाचा तिसरा खटला ३७ कच्चा दिलाचेच आहो. साहेब बोलला म्हणजे आम्ही हो हो म्हणतो. आणि घरी येऊन हसतो. पण घरी त्याला हसून उपयोग काय ? तेथे त्याच्या तोंडावरच हसले पाहिजे. मी सांगतो हे सर्व धर्माच्या लोकाकरिता सर्व धंद्याच्या लोकांकरिता आहे. स्वातंत्र्यसत्तेचे औषध सर्वाना हवे असते व मानवतेहि कारणानी परकी अधि काऱ्यांची सत्ता आली. कारणानी ती घालविली पाहिजे. नुकताच बेळगावाला आम्ही स्वराज्यसंघ स्थापला. राष्ट्रीय सभेपुढे हा प्रश्न आहेच. पण प्रान्ता प्रान्ता- नीहि ही चळवळ केली पाहिजे. " या एका व्याख्यानाने नगरच्या श्रोतृवृंदाचे समाधान झाले नाही. म्हणून दुसरे दिवशी जुन्या कापड बाजारांत दुसरे व्याख्यान टिळकांचे झाले. फिरून चौकर वकील यानीच अध्यक्षस्थान स्वीकारले होते. ह्या दुसन्या व्याख्यानाचा सारांश खाली दिल्याप्रमाणे:- " आम्ही स्वराज्य मागतो यात सर्व काही येते. माझा नातु सोन्याच्या ताटात जेवलेला मी पाहावा असा वर एका प्रसिद्ध गोष्टीतील म्हाताऱ्याने मागि- तला तशीच आमची मागणी सर्वसमावेशक आहे. एक स्वराज्य नाही म्हणजे काही नाही. एकेक हाती घेऊन सर्व सुधारणा आपल्या आपण केल्या तरी त्याचा उपयोग नाही. कोणतीहि एक सुधारणा पूर्णावस्थेला गेली तरी तिने काय होईल? या सर्व सुधारणा फलप्रद व्हावयाच्या तर स्वराज्याचे अधिकार पाहिजेत. स्वरा- ज्याची गाडी भलत्या रुळावर नेऊन ठेवावी म्हणून वेगवेगळ्या सुधारणांचे स्तोम माजविण्यात येते. इतर देशांत हे इतके स्पष्ट करून सांगावेहि लागत नाही. इति- हासामध्ये ज्योतिषाप्रमाणे योग असतात. पूर्वजांच्या कर्तबगारीचे कौतुक करिता पण त्यांच्या गुणाला सत्तेचे पाठबळ होते. स्वातंत्र्यानेच गुण उदयाला येतात. मनाच्या हलकेपणाने आज सगळ्या राष्ट्राला ग्रासले आहे. होमरूलच्या चळवळीलाहि काही प्रतिष्ठित लोक हरकत घेतात हे दुर्दैव होय. चिल्लर सुधारणानी स्वराज्य मिळेल अशी माझी खात्री पूर्वी झाली नाही आणि उरलेल्या थोड्या आयुष्यात होणार नाही. स्वराज्य गुरुकिल्ली आहे. स्वराज्याची जी मागणी आम्ही करतो तिला परकी राजा वावडा नाही. इंग्लंडात नांवाला स्वदेशी राजा असता प्रजेला सर्व अधिकार मिळालेले आहेत. तसेच आम्हालाहि हवेत. फारतर आमचा राजा परकी असेल. त्याचे राजेपण आम्ही कायम ठेऊ. पण राजाची तक्रारच नाही. आहे ती मधल्या कोठावळ्याची हे पुन्हा सांगतो. तो मधला निघाल्या- शिवाय आम्ही नामर्दाचे मर्द होणार नाही. आज शिते खायला मिळतात पण कावळ्यालाहि कधी खाण्याची वाण पडत नाही. नुसते खाणे जगणे व मरणे यात पुरुषार्थ नाही. मुख्य सत्तेपैकी थोडातरी अंश ताब्यात घ्या. परिषदेचे अध्यक्ष केळकर यानी सांगितल्याप्रमाणे सत्तेचा थोडा अंश असला तरी त्यात पूर्ण मुखत्यारी मिळावी. आम्ही माणसे व इतर पशुपक्षी यात भेद काय ? आज नुसते एक दारूचे दुकान बंद करावयाचे तर त्याच्या उत्पन्नाच्या इतक्या रुपयांचे