पान:लोकमान्य टिळक यांचे चरित्र -उत्तरार्ध खंड 3.pdf/१०३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

३६ लो० टिळकांचे चरित्र काळे की गोरे हा भेद त्यानी मनात आणू नये. आझी " भाग २ स्वराज्य' मागतो ते ' स्थानिक स्वराज्य' नव्हे. वर बादशहा व इंग्रजी सत्ता कायम. पण बाकीची व्यवस्था करण्याचे अधिकार पूर्णपणे लोकांच्या हाती असणे हेच स्वराज्याचे लक्षण. इंग्रजांच्या जागी जर्मन यावे असे आम्ही इच्छित नाही म्हणूनच तर हिंदी वीर रणभूमी- वर प्राण खर्ची घालत आहेत. त्यांच्या रक्तापेक्षा राजनिष्ठेचा अधिक पुरावा कोणता द्यावा ? शौर्याप्रमाणे विद्येनेहि आम्ही लोक कमी नाही. मग काळ्या गोऱ्यात भेद का? आमच्यातील काही काळे वडे अधिकारी होतात. पण चालू पद्धतीमुळे तेहि गोया सारखेच बनतात. म्हणून पद्धतिच बदलावी ही आमची मुख्य मागणी. चार दोन काळे गोऱ्यांच्या जागी नेमल्याने ती पुरी होणार नाही. पैसा पुष्कळ खर्च होतो पण तो अनाठायी. लोकशिक्षणाला पैसा नाही आणि कलेक्टरचा पगार मान २५०० रुपये ! सगळ्या ब्रिटिश साम्राज्याची सूत्रे हलविणाऱ्या मुख्य प्रधानाला ५००० रुपये पगार आणि तो इकडे ज्या व्हायसरॉयला पाठवितो त्याला पगार २०,००० रुपये ! जा आणि खा हे इंग्लंडचे हिंदुस्थानासंबंधाचे तत्त्व आहे. लोकांचे दुकान तुमच्या हाती चालवायला दिले तर मुनीमाला ५० ऐवजी १०० रुपये तुम्ही सहजच देणार. हे सर्व टळावे म्हणून लोकांच्या स्वाधीन सर्वं अधि- कार पाहिजेत. म्हणजे काटकसर होते योग्य खर्च होतो सर्व काही होते. दादा- भाईनी याचकरिता स्वराज्य मागितले. घोडा अडतो कोठे ? विड्याची पाने का सडली? असल्या अनेक प्रश्नाना एकच उत्तर 'न फिरविल्यामुळे.' तसेच राजकारणा- तळेहि उत्तर आहे. या फिरवाफिरवीत आम्हाला प्रथम थोडीबहुत सत्ता पण शेवटी पूर्ण सत्ता मिळाली पाहिजे. पाणी प्यावयाचे ते आपल्या विहिरीचे आपण काढून स्वतः प्यायले पाहिजे, परावलंबनात तरणोपाय नाही. सुदैवाने इंग्रजांची दृष्टि थोडि बदलली आहे. त्यांना दिसू लागले की हिंदुस्तानातील ३० कोटि लोक केव्हाना केव्हा तरी आपले राज्य घेतील. म्हणून आपण त्यांना हत्यारे काढून घेऊन दास्यात ठेवतो ते बरोबर नाही. ह्या बदललेल्या बुद्धीचा फायदा घ्या. युद्धामुळे ही संधि मिळाली अशी पुन्हा येणार नाही. आमच्या मागणीने अखेर कोणाचे नुकसान नाही. नुकसान अधिकाऱ्यांचे तेवढेच. म्हणून ते आमच्या पूर्वजाना मूर्ख ठरवू पाहतात. नाना फडणीस मूर्ख मलिकंबर मूर्ख आणि आजची आम्ही तर काय पोरेच. पण ५० वर्षे राज्य करून आम्हाला शहाणे केले नाही तर दोष कोणाचा ? सगळ्या जनतेला मूर्ख म्हणणे हे उलट अधिकाऱ्यांच्या नालायकीचे लक्षण आहे. कामाची संधि न देता नालायक म्हटले तर कोण ऐकतो ? पण आपणहि आता जोराने बोलून मागणी केली पाहिजे. त्रास होईल तो सोसला पाहिजे. सर्वानी एक झाले पाहिजे. मागणी पदरात पडल्याखेरीज संतोष राहणार नाही असे जगाला दाखविले पाहिजे. निश्चयाखेरीज काम नाही. मागणी पुरी होईपर्यंत चळवळ बंद करू नका. आम्ही मेलो तरी पोरेबाळे चळवळ चालवितील. या चळवळीत श्रीमं- तानी पैशाने, बुद्धिवंतानी सल्लामसलतीने साहाय केले पाहिजे. अजून आम्ही