पान:लोकमान्य टिळक यांचे चरित्र -उत्तरार्ध खंड 3.pdf/१०१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

३४ लो० टिळकांचे चरित्र भाग २ चितळे यांना देण्यात आले होते. नगरात यावेळी एकी असून उत्साह पुष्कळ होता. आणि टिळकांनी नगरास भेट देण्याचे कबूल केल्यामुळे तो दुणावला होता. तारिख ३१ मे रोजी सकाळी टिळक केळकर व इतर मंडळी नगर स्टेशनवर पोचली तेथून शहरापर्यंत त्यांची मिरवणूक काढण्यात आली. शहरचे मुख्य रस्ते अडून गेले होते. आणि गर्दीत एकदोन लहानसे अपघातहि झाले. तेथील एक प्रमुख मार वाडी व्यापारी हे मिरवणूकीची व्यवस्था करीत असता एका स्वयंसैनिक घोडेस्वा- राचा जबर धक्का त्यांना बसला होता म्हणून मिरवणूक संपताच टिळक केळकरांनी सदर गृहस्थांच्या घरी जाऊन त्यांच्या प्रकृतीची चौकशी समक्ष केली. परिषद बागडे थिएटरात भरली होती. सर्व पक्षांचे लोक हजर होते. लो. टिळकहि परि- पद चालू असता हजर राहिले. परंतु त्यांची वेगळ्या वेळी दोन स्वतंत्र व्याख्याने व्हावयाची ठरल्यामुळे परिषदेत भाषण करण्याची विशेष तसदी त्यांना कोणी दिली नाही. टिळकांचे व्याख्यान होण्यापूर्वी त्यांना शहरात अनेक ठिकाणी पानसुपाऱ्या झाल्या. नगरच्या व्यापाऱ्यांनी त्यातल्यात्यात विशेष पुढाकार घेतला होता. आणि टिळकांचे व्याख्यान बाजारपेठेत व्हावे म्हणून तेथे त्यानी मुद्दाम मंडप घातला होता. व्याख्यानाला अतिशय गर्दी झाली होती. पहिले व्याख्यान तारीख ३१ मे रोजी सायंकाळी झाले. अध्यक्षस्थानी नगर येथील वृद्ध वकील व पुढारी चौकर हे होते. ही व्याख्याने टिपून घेण्याकरिता येथेहि सरकारी लघुलेखक हजर होते. टिळकानी स्वतः आपले रिपोर्टर ठेवले नव्हते. कारण व्याख्याने मराठीत व्हावयाची व मराठी लघुलेखक तेव्हा मिळत नव्हते. वर्तमानपत्रातून वगैरे टिळ कांच्या व्याख्यानाचा सारांश प्रसिद्ध झाला. पण तो फारच त्रोटक होता. पहिल्या व्याख्यानापूर्वी टिळकाना मानपत्र देण्यात आले. परंतु त्याला वेगळे म्हणून उत्तर न देताना टिळकानी होमरूल ह्या विषयावरच मुख्यतः भाषण केले. व्याख्यानाचा सारांश स्थूलपणे असा होता: - "तुम्ही मला सन्मान देण्याकरिता बोलावून आणले व ती संधिसाधून मी आपले कार्य तुमच्याकडून साधणार अशी विपरीत गोष्ट घडत आहे. पण या कार्यात माझ्या इतका तुमचाहि फायदा आहे. लोकाना हितावह अशा अनेक गोष्टी सांगता येतात. पण राजकीय दृष्टया जी तुमच्या हिताची गोष्ट तीच मी तुम्हाला मुख्यतः आज सांगणार आहे. घरच्या खाजगी गोष्टीतहि हिताच्या गैरहिताच्या अशा असतात. पण त्यांची चर्चा आपण घरी व खाजगी रीतीने तरी करितो. सार्वजनिक हिताची गोष्ट तशी नाही. तिची प्रसिद्धपणे चर्चा करावी लागते. या चर्चेत पहिला मुद्दा केव्हाहि असाच निघतो की, आपल्या हाती अशी कोणतीहि गोष्ट नसल्याने देशातील सर्व घडी बिघडली आहे. परदेशी वस्तु नव्हे स्वदेशीच. पण दारू नकोशी वाटते. पण बंद करण्याची सत्ता नाही. ५- ५० वर्षांच्या विचाराने शाहाण्या हिंदी पुढाऱ्यानी हाच एक सिद्धान्त हुडकून काढला. यावर कोणी म्हणतात दारू बंद करण्याची सत्ता तुम्हाला नसेल पण