पान:लेखनपद्धति.pdf/३१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( २९ )

विनतिउपरी येथील कुशल तागाईत महिनापक्ष तीथ पावेतों फरवरूप असोविशेष मजकूर लिहिणें असेल तो लिहाया. सदैव पत्र पाठवून कुशल वृत्त लिहीत जायें बहुतकाय लिहि णें रूपालोअ करावा हे विनंति

लग्नपत्रिका लिहिण्याचा शिरस्ता.

ब्राह्मणादि करून सर्वजातींनी परस्परें लग्नपत्र लिहिणे झाल्यास शिरस्त्यानें माना विशेषपर्यंत लिहून चिरंजीव नांव अथवा कन्ये चें नांव किंवा आप्त स्वकीयांचा किंवा परकीयांचा पुत्र किंवा क न्येचें नांव लिहून याचें अथवा इचें लग्न अमुक महिन्यांत अम के तिथीस अमके वारी दिवा किंवा रात्री अथवा गोरज अमके घटिकांची योजना केली आहे. शरीरसंबंध अमक्याची क न्या वधू नेमस्त केली. आहे. किंवा अमक्याचा पुत्र वर निश्चय केला आहे. तरी आपण सहपरिवार येऊन कार्य संपादन केलें पाहिजे. याप्रमाणे लिहून शिरस्त्याप्रमाणे पुरतें करावें. मिति महिना पक्ष तीथ शक संवत्सर.

व्रतबंधपत्राचाशिरस्ता.

ब्राह्मणादि जातींनी एकमेकांस परस्परें व्रतबंधपत्रिका लिहि- णें तर विनंति विशेष किंवा विज्ञापनाविशेषपर्यंत आपले लिहि- ण्याचे शिरस्त्यानें लिहून नंतर चिरंजीव नांव याचा अथवा अमु काचे पुत्राचा व्रतबंध अमुक महिन्यांत शक्लपक्षी अथवा कृष्ण पक्षी अमुक तिथीस अमकेवारी अमके घटिकांचा निश्चय के ला आहे तर आपण सहकुटुंब सहपरिवार येऊन कार्यसिध्दि केली पाहिजे. अथवा मंडपशोभिवंत केला पाहिजे. याममाणें लि हून शिरस्त्याअन्वयें पुरतें करावें. नंतर महिना पक्ष तीय शक संवत्सर लिहावे.

संन्याशी यानें गृहस्थासपत्र.
श्रीमंतपरमहंस इत्यादिविशेषणेंजी लिहा-