पान:लेखनपद्धति.pdf/२७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(२५)
लिहून मागाहून अनुक्रमानें नावें जशी
लिहिली असतील तशी लिहावींस-
मस्तगीतगंगायांसीं,

राजीनामा बेशमी नांवविन्नांव आडनांव सुकाम कारण लिहून देतों राजीनामा ऐसाजे, नंतर आपला मजकूर कोणता कसा लिहिणें असेल तो संगतवार लिहून नंतर येविषयीचा वास्त- विक निर्णय करून तुझी पंच अथवा गोतगंगा मला ज्याप्रमा णें वर्तणूक करावयास सांगाल त्याप्रमाणे मी करीन. जरकरि तां मजकडून नवदिगर होईल तर पंचांचा खोटा अथवा जाती- चा खोटा हा राजीनामा मी आपले अक्कल हुषारीनें व खुषर जावंदीने लिहून दिल्हा असे. मिति महिना पक्ष तीथ शक सं वत्सर दस्तर लिहिणाराचें नांव बिन्नांव आडनांव मुकाम रा जिनामा देणारानेंच लिहिले तर दस्तर खुद्द असे लिहावे. साक्षदोन असावे किंवा ज्या-

स्ती असावे.


राजीनामादेणाराची सही

.

करारपत्र लिहावयाचा शिरस्ता.

करारपत्र शक संवत्सर महिना पक्ष तीथवार ले दिवशी राज श्री नांव बिन्नांव आडनांव मुक्काम नांव बिन्नांव आडनांव मु- काम कारणें करारपत्र आह्मी तुझांस लिहून देतों असे की, जो करार उभयतांचा असेल तसा संगतवार लिहावा. नंतर या प्रमाणें तुमचा आमचा करार ठरून हे पत्र तुझांस आह्री स्वसं तोषें लिहून दिल्हें असे. यांन आह्मांकडून तफावत पडल्यास नुकसानीची अटक लिहून देण्याघेण्याची असेल ती लिहावी. हैं करारपत्र लिहून दिल्हें सही. दस्तर लिहिणाराचें नांव बि- नांव आडनांव मुकाम.

साक्ष १ पेक्षां ज्यास्त असावे.

सही करारपत्र देणाराची.

साटेपत्रलिहिण्याचा शिरस्ता.