पान:लेखनपद्धति.pdf/२४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(२२)

पासून अमुक दिवसांनी किंवा अमुक महिन्यानीं अथवा अ मुकवर्षांनी व्याज व मुद्दलरूध्दां एकंदर रुपयांचा उलगडा, करून देऊ हे रुपये देशी परदेशी कांहीएक हरकत नसांगतां देऊं यासी अंतर पडणार नाही. हे खत आह्मी आपले अक्कल हुशारीनें व खुषरजावंदीने लिहून दिल्हें सही दस्तर लिहि- णाराचें नांव बिन्नांव आडनांव मुकाम किंवा कर्ज घेणारा रे मालकानेंच लिहिले असतां दस्तर खुद्द याप्रमाणे लिहावें. सासएक असूनये जाजती असावे सही लिहिणाऱ्यामालकाची किं

वा निशाणी.

 कर्ज रुपये घेतले त्याची फेड होण्यास्तव हमे लावून द्याव या घ्यावयाचे किंवा सावकाराजवळ दागिना अथवा कांहीं इस्टे ट गाहाण ठेवू न रुपये घ्यावया द्यावयाचे त्यास किंवा जामीन देऊन सावकारास रखतकरून द्यावयाचे त्याचे शिरस्ते दोनम कारचे आहेत परंतु मुख्यत्वेकरून गाहाण किंवा हप्ते अथवा जामीन हे तिन्ही प्रकारचे लेख कर्जाचे पोटचे आहेत. तेव्हां कर्जवत लिहून त्यांत तिन्हींतून कोणता प्रकार लिहिणेंअ सेल तो लिहावा. ते तिन्ही प्रकार खालीं प्रसिद्ध लिहिले आ हेत.

हप्तेबंदीखतलिहिण्याचाशिरस्ता

कर्जवत शक संवत्सर महिना पक्ष तीथवार तारीख माहे ईस- बीसन से दिवशी खत लिखिते धनकोनाम राजश्री नांवकिलां व आडनांव मुकाम यांसी रिणकोनाम नांवबिन्नांव आडनांव मुकाम आझी तुलांपासून अमुक गर्जेस्तव घेतले कर्जमुद्दल अमुक चलनी रुपये अंकी अमुक अक्षरी अमुक यासि व्याज दर महा रुपयास अमुकममाणें करार केला असे. या रुपयांची फेड हमेबंदी येणेप्रमाणे.
 अंक अमके महिन्यांत अमुकतारखेस अमुक