पान:लेक लाडकी (Lek Ladaki).pdf/9

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

= = = = = = = = • - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - = = = | प्रकरण - प्रकरण) || १ | मुली का नकोशा आहेत ? - - - - - - - - - - - - - - - - - - - - । । । प्रश्न १- गर्भलिंग निवड म्हणजे काय? पोटातील गर्भाचे लिंग जाणून घेणं आणि जर ती मुलगी असेल तर गर्भपात करणं म्हणजे गर्भलिंग निवड. गेल्या काही वर्षात गर्भाचं लिंग जाणून घेण्यासाठी सर्वात जास्त वापरलं जाणारं तंत्रज्ञान म्हणजे अल्ट्रासाउंड सोनोग्राफी आणि मुलगी असेल तर नंतर गर्भपात. १९८० नंतर सोनोग्राफीचे तंत्रज्ञान सर्वदूर पसरलं, परिणामी गर्भलिंग निदानात वाढ झाली आणि ०-६ वयातील मुलींची संख्या झपाट्याने खालावू | | | | | लागली. प्रश्न २- मुली का नकोशा आहेत ? • मुलगा वंशाचा दिवा व मुलगी परक्याचे धन मानले जाते. आपल्या समाजातील मुलींच्या जन्माकडे आपुलकीने पाहिले जात नाही ही उघड बाब आहे. मुलींना कमी लेखण्याची किंवा नाकारण्याची परंपरा आपल्याकडे फार पूर्वीपासून आहे. समाजातील रूढी परंपरा, पुरूषप्रधान संस्कृतीने घडविलेली मानसिकता या देखील मुलींकडील दुर्लक्षास कारणीभूत आहेत. ० मुलगाच हवा हा अट्टाहास : पुरुष सत्ताक समाज रचनेमध्ये विकासाच्या, आधुनिकतेच्या कितीही गप्पा मारल्या तरी मुलगा हवा हा अट्टाहास आहेच. पुरूषांना मुलगा हवाच असतो. पण कुटुंबामध्ये मुलींना दिले जाणारे दुय्यम स्थान पाहून आणि त्याचे प्रत्यक्ष अनुभव ...४...