पान:लेक लाडकी (Lek Ladaki).pdf/10

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

| | | | ।। । । । ।। । । घेणा-या, चटके सोसणा-या स्त्रीयांनाही असे वाटते की, आपल्या वाट्याला आलेले भोग आपल्या मुलीच्या वाटेला नको म्हणून तीही ‘मुलगाच हवा' असा हट्ट धरते. मरणोत्तर अग्नी देण्यासाठी आणि मुलाने अग्नी दिल्यानंतर स्वर्गाचे दार उघडते | अशी समजूत आहे. त्यामुळे मुलगा हवा हा अट्टाहास आहे. • हुंड्याची प्रथा: हुंड्यामुळे स्त्रियांचे जेवढे बळी गेले असतील तेवढे तर एखाद्या घनघोर युध्दातही कदाचित लोक मारले गेले नसतील. आजही हुंड्यासाठी महिलांचे बळी जातच आहेत. आपल्याकडे मुलीचे लग्न व्हावेच लागते. मुलगी अविवाहीत राहू शकत नाही. लग्नात रितीभातीप्रमाणे, जाती परंपरेप्रमाणे हुंडा द्यावाच लागतो. शिवाय संपत्तीत हक्कही ठेवला आहे. मुली माहेरच्या कुटुंबाच्या घराला लग्नानंतर सासरी गेल्यामुळे आर्थिक उत्पन्न वाढविण्यासाठी उपयोगी नसतात. हुंड्याबरोबर संपत्तीत हक्क सांगणा-या आणि सासरी जाणा-या, म्हातारपणी सांभाळायला घरी नसणा-या मुली या कुटुंबासाठी तोटाच ठरतात. म्हणून मुली नकोशा आहेत. | | | बाईचे चारित्र्य: बाईचे चारित्र्य म्हणजे भांड काचेचं, तडकलं की फुटलं या समजामुळे बदललेल्या सामाजिक परिस्थितीत मुलींना सांभाळणे अवघड झाले आहे असे पालकांना वाटते. ती अविवाहीत राहिली, विनयभंग, छेडछाड, बलात्कार या सारखा प्रकार तिच्याबाबत घडला तर हा गुन्हा करणारा नाही तर जिच्या बाबतीत हा गुन्हा घडतो, ती मुलगी आणि तिचे कुटुंबिय बदनाम ठरतात. म्हणून संरक्षणाच्या कारणाखाली ‘मुलगी नको' अशी भूमिका घेतली जाते. ५...