पान:लेक लाडकी (Lek Ladaki).pdf/8

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

चित्र आणि आकडेवारी सकारात्मकरित्या बदलू शकतो. म्हणूनच सदर कायद्याच्या अंमलबजावणीमध्ये ग्राम आरोग्य,पोषण व स्वच्छता समितीचे सदस्य हे अतिशय महत्वाची भूमिका पार पाडू शकतात. गावाच्या आरोग्याच्या नियोजन आराखड्यात पी.सी.पी.एन.डी.टी. कायदा आणि मुलींच्या कमी होणा-या संख्येचा प्रश्न जाणीवपूर्वक अंतर्भूत केल्यास भविष्यकाळात आरोग्य, आहार आणि स्वच्छतेबरोबरच मुलींच्या संख्येबाबत सजग असणारे गाव अशी आपल्या गावाची ओळख निर्माण करणे शक्य आहे. म्हणूनच सदर पुस्तिका ही विशेषत्वाने सोप्या भाषेत मुलींची कमी होणारी संख्या आणि पी.सी.पी.एन.डी.टी. कायदा याबाबत प्रश्नोत्तर स्वरूपात आपणासाठी प्रशिक्षण साहित्य म्हणून निर्माण केली आहे. सदर पुस्तिका आपल्या हाती देत असताना गाव पातळीवर आपले स्थान आणि आपली कृतीशिलता याच्याविषयी आम्हास नितांत आदर आहे. ही पुस्तिका कमी होणारी मुलींची संख्या आणि पी.सी.पी.एन.डी.टी. कायदा हा विषय समजून घेण्यास तसेच त्या दृष्टीने विविध उपक्रम करण्यास, आपल्या गावाचा आरोग्य आराखडा बनविण्यास आपल्याला सहाय्यभूत ठरेल अशी आम्हास आशा आहे. । । | या पुस्तिकेमध्ये दिलेल्या माहितीच्या आधारे आपण मुलींची कमी होणारी संख्या वाढविण्यासाठी व गर्भधारणापूर्व आणि प्रसुतीपूर्व निदान तंत्र (गर्भलिंग निदान प्रतिबंध) कायदा १९९४, सुधारित २००३ कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी आपण सहकार्य करावे असे आपणास आवाहन करत आहे. लेक लाडकी अभियान ...३...