पान:लेक लाडकी (Lek Ladaki).pdf/7

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

राज्य घटनेने ग्वाही दिलेली समानता गर्भाशयापासून थडग्यापर्यंत अनुभवता यावी यासाठी संबंधीत सर्व घटकांनी पुढाकार घेण्याची गरज आहे. म्हणूनच गर्भलिंग निदान प्रतिबंधक कायदा पारित करण्यात आला आहे. गर्भलिंग निदान करून सदर कायद्याचे उल्लंघन करणा-यांवरती कारवाई करणे आणि मुलींच्या जन्माचे स्वागत केले जाईल असे सामाजिक वातावरण निर्माण करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. गावागावात कार्यरत असणा-या ग्राम आरोग्य, पोषण व स्वच्छता समिती सदस्य, आशा, अंगणवाडीताई, ग्रामसेवक, तलाठी, ग्रामपंचायत सदस्य ते तालुका, जिल्हास्तरावर कार्यरत असणा-या वैद्यकीय अधिकारी, सल्लागार समिती, डॉक्टरांच्या आणि स्त्रियांच्या संघटना, सरकारी वकील, प्रशासन, न्यायासन या सर्वांचीच सदर कायद्याच्या अंमलबजावणीत महत्वाची भूमिका आहे. लेक लाडकी अभियानात सर्वच घटकांनी सातत्याने जागरूक राहून आपआपली भूमिका पार पाडल्यास बीड जिल्ह्यासह महाराष्ट्रात मुलींच्या कमी होणा-या संख्येचे चित्र बदलणे, सकारात्मक करणे शक्य आहे. गाव पातळीवर आरोग्य, आहार आणि स्वच्छता यासाठी गठीत करण्यात आलेल्या ग्राम आरोग्य, पोषण व स्वच्छता समितीच्या स्तरावर सक्रीय राहून सदस्य प्रभावीपणे भूमिका बजावू शकतात. ग्राम आरोग्य, पोषण व स्वच्छता समिती सदस्यांनी मुलींची कमी होणारी संख्या, त्यांची कारणे आणि पी.सी.पी.एन.डी.टी. कायदा समजून घेणे आवश्यक आहे. गावस्तरावर कृतीशील भूमिका घेवून सजगपणे गावातील वातावरण मुलींच्या जन्माचे स्वागत करणारे आणि कायद्याच्या अंमलबजावणीसाठी पोषक करणे गरजेचे आहे. गाव पातळीवर व्ही.एच.एन.एस. समिती सक्रीय झाल्यास अतिशय कमी वेळात अभियान राबवून आपण जिल्ह्यातील । । ...२...