पान:लेक लाडकी (Lek Ladaki).pdf/6

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

= = = = = = = = = = = = = = = = = । । • =

=

= =

= =

= = • • प्रास्ताविक -.-.-.-.-.-.-.-.-.-.-.-.-.-.-.-.-.-.-.-.-.-.-.-.-.-.-.-.-.-.-.-.. । । । । । । । । । । । । । । । । । । । । मुलींची कमी होणारी संख्या ही आज राष्ट्रीय समस्या बनली आहे. भारतात पुरूषसत्ताक कुटुंब व्यवस्था हजारो वर्षांपासून अस्तित्वात आहे. त्यामुळे स्त्रियांशी दुजाभावाने वागणे याला रूढी परंपरांची मान्यताही आहे. पुरूषसत्ताक व्यवस्थेमध्ये हजारो वर्षांपासून स्त्रियांना दुजाभावाने वागवले गेले आणि त्यातूनच पूरूषी हिंसेला स्त्रियांना तोंड द्यावे लागले. सतीची चाल, बालिका हत्या, हुंडाबळी, कुपोषण, बलात्कार, विनयभंग, शिक्षण हक्कापासून वंचित ठेवणे, रक्तक्षयामुळे ओढवणारे मृत्यु, सामुहिक बलात्कार, छेडछाड, अपहरण, कामाच्या ठिकाणी होणारी लैंगिक हिंसा अशा एक ना दोन हिंसेच्या अनेक प्रकारांना स्त्रिया तोंड देत आहेत. परंतू स्त्रिया जिवंत राहून व्यवस्थेविरूद्ध आतापर्यंत किमान लढू शकत होत्या, कारण राज्य घटनेने आणि कायद्याने स्त्रियांना पुरूषांच्या बरोबरीने अधिकार दिलेला आहे. परंतू गेल्या ३० वर्षांपासून 'मुलगी नको' ह्या नकारात्मक भूमिकेतून गर्भाशयातच मुलींचा शोध घेवून त्या गायब केल्या जात आहेत. दरवर्षी सहा लाख मुली भारतात गर्भलिंग निदान आणि निवडीमुळे गर्भातच गायब केल्या जातात. बुरसटलेल्या स्त्री विरोधी पुरूषी हिंसक मानसिकतेबरोबर नैतिकता ढासळलेल्या वैद्यकीय क्षेत्राने आणि तंत्रज्ञानाने केलेल्या अभद्र युतीमुळे मुलींची संख्या मुलांच्या तुलनेत समाजात दिवसेंदिवस घटत आहे. । । त्यामुळे संपूर्ण समाजातील लोकसंख्येचा समतोल ढळत आहे. त्यामुळे सामुहिक बलात्कारासारख्या गंभीर परिणामांना तोंड देण्याची वेळ येवू घातली आहे. १.