पान:लेक लाडकी (Lek Ladaki).pdf/55

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

| | | | । । । आरोपांसाठी पी.सी.पी.एन.डी.टी. कायद्याखाली इस्लामपूर न्यायलयात गुन्हा दाखल करण्यात आला आणि डॉ. रंजना आवळे, डॉ. राजेंद्र पाटील, प्रकाश व अंकुश यांचेविरुध्द गर्भाचे लिंग निदान करणे, गर्भलिंग निदान करण्यासाठी (एजंट म्हणून) मदत करणे इ. आरोपांसाठी पी.सी.पी.एन.डी.टी. कायद्याखाली शिराळा न्यायालयात गुन्हा दाखल करण्यात आला. त्याच्यासोबत योग्य ते पुरावे जोडण्यात आले. केसचे कामकाज सुरू झाल्यानंतर डिकॉय मॉम सुनिता हिला परस्पर आरोपी रंजना आवळे आणि राजेंद्र पाटील यांनी पैशाचे आमिष दाखवून इस्लामपूर येथे डांबून ठेवले आणि न्यायालयात साक्षकामी हजर केले. सदर प्रकरणी सरकारी वकिलांच्या लक्षात ही गोष्ट आल्यानंतर त्यांनी स्वयंसेवी संस्थेला उपस्थित राहण्याचा हुकूम करा कारण साक्षीदाराजवळ कोणतेही ओळखपत्र नाही. त्यामुळे हीच ती साक्षीदार आहे, हे ओळखण्यास समुचित प्राधिकारी यांनीही नकार दर्शविला. दुस-याच दिवशी परत डिकॉय मॉमचा जबाब नोंदविण्याकामी न्यायालयाने तारीख नेमली आणि स्वयंसेवी संस्थेच्या प्रतिनिधीला हजर ठेवण्याचे आदेश दिले. आरोपींनी त्याही दिवशी डीकॉय मॉमला इस्लामपूर येथे आपल्या ताब्यात ठेवले. डिकॉय मॉमने स्वंयसेवी संस्थेच्या प्रतिनिधीशी संपर्क साधला आणि ती अडचणीत असल्याचे सांगितले. अॅड.वर्षा देशपांडे यांनी इस्लामपूर पोलीसांच्या मदतीने डिकॉय मॉमला आरोपीकडून ताब्यात घेतले. घडल्या घटनेचे अॅफिडेव्हीट केले आणि इस्लामपूर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हाही दाखल केला. न्यायालयाने सदर गोष्टींची गंभीरतापूर्वक नोंद घेवून साक्षीदारांवर दबाव आणणे आणि पुरावा नष्ट करणे या आरोपांखाली आरोपींचे जामीन रद्द केले आणि केसचे कामकाज सुरू केले. डिकॉय मॉमने तिचा जबाब इस्लामपूर आणि शिराळा न्यायालयात नोंदविला आणि सरकारी पक्षाला मदत करणारी सत्य घटना तिने कोर्टात सांगितली. तसेच दोन्ही न्यायालयात तिचा उलटतपासही नोंदविण्यात आला. साक्षीदार अॅड. पाटील, पंच विलास, समुचित प्राधिकारी डॉ.श्रीवास्तव यांच्या साक्षीही दोन्ही न्यायालयात नोंदविण्यात आल्या. विशेष सरकारी वकील म्हणून अॅड. उदय वारुंजीकर (उच्च न्यायालय, मुंबई) यांनी युक्तीवाद केला आणि युक्तीवाद आणि न्यायालयासमोर आलेले पुरावे, । । ...५०...