पान:लेक लाडकी (Lek Ladaki).pdf/56

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

। । । । साक्षी ग्राह्य धरुन इस्लामपूर व शिराळा न्यायालयाने दोन्ही ठिकाणी स्वतंत्ररित्या प्रकाश , अंकुश यांना शिराळा कोर्टात ४ वर्षे सक्त मजुरी आणि रु. ५,०००/प्रत्येकी दंडाची शिक्षा ठोठावली आणि डॉ. रंजना आवळे यांना दोन वर्षे सक्त मजुरी आणि रु. ५०००/- दंडाची शिक्षा ठोठावली. डॉ. राजेंद्र पाटील यांना २ वर्षे सक्त मजुरी आणि रु. १००००/- दंडाची शिक्षा ठोठावली. तसेच इस्लामपूर कोर्टात ३ वर्षे सक्त मजुरी आणि रु. ५०००/- प्रत्येकी दंडाची शिक्षा ठोठावली आणि डॉ. समिक्षा पाटील यांना दोन वर्षे सक्त मजुरी आणि रु. १००००/- दंडाची शिक्षा ठोठावली डॉ. राजेंद्र पाटील यांना २ वर्षे सक्तमजुरी आणि रु. १००००/- दंडाची शिक्षा ठोठावली. दोन्ही शिक्षा स्वतंत्रपणे भोगावयाच्या आहेत असे स्पष्ट नमूद केले. | आता दोन्ही प्रकरणाची अपिले सुरू आहेत. दोन्हीही सोनोग्राफी सेंटर्सचे रजिस्ट्रेशन रद्द केलेले आहे. हॉस्पिटल्स बंद आहेत. स्टेट मेडिकल कौन्सिलने आरोपी डॉक्टरांची मान्यता रद्द केलेली आहे आणि सांगली जिल्ह्यामध्ये पी.सी.पी.एन.डी.टी. कायद्याचा वचक निर्माण झालेला आहे. त्याचा परिणाम म्हणून सांगली जिल्हा हा महाराष्ट्रात सर्वात जास्त मुली असणारा आणि १६ गुणांनी वाढ दाखविणारा जिल्हा म्हणून ओळखला जात आहे. जिल्हाधिकारी श्री. वर्धने, प्रांताधिकारी, समुचित प्राधिकारी डॉ. श्रीवास्तव, डॉ. शेंडे, सरकारी वकील अॅड. ढवळे, अॅड. पाटील या सर्वांनी आपआपली भूमिका अत्यंत चोखपणे बजावून रात्री-बेरात्री सुध्दा गरोदर माता आणि तिचे नातेवाईक, संस्थेचे कार्यकर्ते यांना सुरक्षित ठेवून आरोपींना शिक्षा होण्यास मदत केली आहे. आमची ही लढाई डॉक्टरांविरूध्द किंवा सोनोग्राफी मशिनविरुध्द नाही. तर मुलींची संख्या वाढली पाहिजे आणि त्यांना सन्मानाने जगता आले पाहिजे यासाठीची आहे. ...५१...