पान:लेक लाडकी (Lek Ladaki).pdf/54

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

| | | केली. त्यानंतर डॉ. राजेंद्र पाटील यांनी मोठ्या सोनोग्राफी मशीनवर सोनोग्राफी करून लिंग निदानासाठी डॉ. आवळे यांना फोन केला आणि तिस-या दिवशी आम्हाला परत बोलावले आणि संगिता हिला एक महिन्यांनी परत बोलावले आणि सुनिताला दोन दिवसांनी येण्यास सांगितले. तिस-या दिवशी परत अॅड. पाटील, सुनिता, अॅड. वर्षा देशपांडे, वनिता, विलास सर्वजण सकाळी १०.०० वा. ताकारी येथे शिंदे हॉस्पिटलला गेले. दुपारी १.०० वा. च्या सुमारास डॉ. राजेंद्र पाटील, अॅड. पाटील, सुनिता आणि वनिता यांना घेवून बत्तीसशिराळा येथील डॉ. रंजना आवळे यांच्या आवळे हॉस्पिटलमध्ये घेवून गेले. रंजना आवळे यांनी त्वरित सुनिता आणि डॉ. राजेंद्र पाटील यांना आत घेतले. डॉ. राजेंद्र पाटील यांनी सुनिताची ओळख करून दिली आणि पहिली मुलगी सुनिताला असल्याचे सांगितले. डॉ. रंजना आवळे यांनी सुनिताची सोनोग्राफी केली आणि अॅड. पाटील, सुनिता यांना बाहेर बसण्यास सांगितले डॉ. पाटील आतच डॉ. आवळे मॅडमजवळ थांबले १० मिनिटांनी अॅड. पाटील आणि सुनिता यांना डॉ. राजेंद्र पाटील यांनी आत बोलावून घेतले आणि डॉ. रंजना आवळे यांनी सुनिताचा गर्भ मुलगी असल्याचे सांगितले. डॉ. राजेंद्र पाटील यांनी आत सुनिताला मुलगी होणार आहे. तर आता तुम्ही कपडे घेवून आला आहात, असेच अॅडमिट व्हा आणि खाली करूनच जा असे सांगितले. आम्ही डॉ.रंजना आवळे यांच्या दवाखान्यातून बाहेर पडल्यावर वर्षा देशपांडे यांच्या मोबाईलवर एस.एम.एस. केला आणि परत अॅडमिट करून गर्भपात करण्यासाठी ताकारीकडे येत असल्याचे एस.एम.एस. द्वारे कळविले अॅड. वर्षा देशपांडे गाडीसह आमच्या मागेच होत्या. त्यांनी समुचित प्राधिका-यांना घडल्या घटनेचा तपशील सांगितला आणि पोलिसांना घेवून इस्लामपूर चौकात यायला सांगितले. त्याप्रमाणे समुचित प्राधिकारी डॉ. शेंडे तेथे पोलिसांसह आले आणि आम्हा सर्वांना गाडीसह ताब्यात घेवून ग्रामीण रुग्णालयाला नेले, घडल्या घटनेची सत्यता आरोपी, साक्षीदार, गरोदर महिला यांचेकडून परत एकदा समजून घेवून सर्वांचे जबाब नोंदविण्यात आले. डॉ. राजेंद्र पाटील, डॉ. समिक्षा पाटील, प्रकाश, अंकुश यांचेविरुध्द तज्ञता नसताना सोनोग्राफी करणे, गर्भाचे लिंग निदान करणे, गर्भलिंग निदान करण्यासाठी (एजंट म्हणून) मदत करणे इ. ।। ।। ...४९...