पान:लेक लाडकी (Lek Ladaki).pdf/53

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

– । । । - । । । । । । । । । । = =

= = = = = = = =

= । । । अरण कहाणी सिध्दीची । । । । । । । - - । । । - - - - - - - - - - - - - - - - - - - - - । । । । । । । | | | | | | || | | अॅड. वर्षा देशपांडे, अॅड. पाटील, सुनिता, संगिता, विलास (साक्षीदार, गरोदर । मातेची मुळ नावे बदलली आहेत) दि. १२/०७/२००७ रोजी सांगली जिल्ह्यातील तासगांव तालुक्यामध्ये मुलगा-मुलगी गर्भात असतानाच सोनोग्राफीद्वारा तपासणी करून सांगणा-या डॉक्टरांची मिळालेली माहिती सत्य आहे का ? हे पाहण्यासाठी तासगांव, जि.सांगली येथे गेलो. आम्हाला माहिती मिळालेल्या एका डॉक्टरांनी मुलगा-मुलगी बघणे बंद केले आहे आणि दुसरे डॉक्टर परगावी गेल्याचे समजले. जे डॉक्टर परगावी गेले होते. त्यांच्या हॉस्पिटलमध्ये असणारा कपौंडर प्रकाश याने बाहेर येवून आमच्याशी संपर्क केला आणि मी तुम्हाला मुलगा-मुलगी बघायला मदत करतो असे सांगितले. काम रिस्की आहे, काय करायचे असेल तर आताच ठरवा असे सांगितले आणि रात्री फोन करायला सांगितले. त्यानुसार अॅड. पाटील हिने रात्री प्रकाशला फोन केला, त्याने दुसरे दिवशी रु. दहा हजार घेवून बोलावले. अॅड. पाटील यांनी दोन गरोदर मुली घरात आहेत असे सांगताच प्रत्येकी रु. दहा हजार प्रमाणे पैसे घेवून या असे सांगितले. त्यानुसार दुसरे दिवशी सुनीता आणि संगिता या दोन गरोदर महिलांसह, अॅड. वर्षा देशपांडे, विलास, वनिता प्रथम इस्लामपूर आणि नंतर तासगांव समुचित प्राधिकारी यांना भेटले. श्री. प्रकाश याने रु.२०,०००/-, अॅड. पाटील यांचेकडून घेतले आणि एका कागदावर रु. २०,०००/- पोहोचले असा मजकूर लिहून खाली सही व त्याखाली नाव आणि तारीख लिहून दिले. प्रकाश याने अंकुशची भेट घालून दिली आणि डॉ. राजेंद्र पाटील आणि डॉ. समिक्षा पाटील यांच्या ताकारी येथील हॉस्पिटलला पाठविले. डॉ. समिक्षा पाटील आणि डॉ. राजेंद्र पाटील आधी मध्यस्थीशी बोलले आणि मग सुनिता आणि संगिता यांची सोनोग्राफी केली आणि संगिता हिचा गर्भ लहान आहे. त्यामुळे नीट लिंग दिसत नाही, असे सांगितले दोघींचीही सोनोग्राफी डॉ. समिक्षा पाटील यांनी केली. पण पी.सी.पी.एन.डी.टी. कायद्यांतर्गत कोणताही फॉर्म भरला नाही. सही घेतली नाही. डॉ.समिक्षा पाटील या बी.एच.एम.एस. डॉक्टर, त्यांना सोनोग्राफी करण्याची कोणतीच तज्ञता आणि अधिकार नसताना त्यांनी सोनोग्राफी | | ...४८...