पान:लेक लाडकी (Lek Ladaki).pdf/50

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

। । | | कार्यकारी अधिकारी, जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलिस अधीक्षक हे मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते. अॅड. वर्षा देशपांडे यांना साधन व्यक्ती म्हणून जिल्हा प्रशासनाने निमंत्रित केले होते. २६ जानेवारी २०१५ रोजी होणा-या सर्व ग्रामसभेमध्ये 'बेटी बचावो,बेटी पढावो' अंतर्गत ग्राम आरोग्य,पोषण व स्वच्छता समितीने तयार केलेल्या कृती आराखडा ग्रामसभेत संमत करून घेण्याचा निर्णय करण्यात आला. तसेच प्रत्येक ग्रामसभेला निवडणूकीप्रमाणेच निरिक्षक नेमण्यात आले. तालुका निहाय या सर्व निरिक्षकांचे ग्राम सभा यशस्वी होण्यासाठी प्रशिक्षण घेण्यात आले. जिल्हाधिका-यांनी अधिकृतपणे निवडणूकीप्रमाणेच निरिक्षकांना ग्रामसभेला हजर राहून अहवाल सादर करण्याबाबत आदेश जारी केले. जिल्हाधिकारी, महिला बाल कल्याण अधिकारी, जिल्हा आरोग्य अधिकारी, डॉ.वडगावे, यु.एन.एफ.पी.ए. च्या प्रतिनिधी अनुजा गुलाटी, धनश्री ब्रम्हे व अॅड. वर्षा देशपांडे या सर्वांनी प्रत्यक्ष गावामध्ये जावून ग्रामसभेच्या कामकाजाचे निरीक्षण केले. ग्रामसभा सक्षम करण्याबाबत अंबेजोगाई, मानव लोक समाज शास्त्र महाविद्यालयातील विद्याथ्र्यांच्या मदतीने पथनाट्य बसविण्यात आले. चित्र रथ तयार करण्यात आले. वातावरण निर्मितीसाठी जिल्ह्यातील ११ ही तालुक्यामध्ये बाजार गावात पथनाट्याचे प्रयोग करण्यात आले. गावामध्ये ख-या अर्थानी स्त्री-पुरुषांच्या उपस्थितीत ग्रामसभा झाल्या. गावातील एकही माता गर्भलिंग निदान करण्यासाठी जाणार नाहीत. हा ठराव सहभागी सर्व गावांनी पारीत केला. हुंडा न घेता, भागात होणा-या लग्नाची नोंद ठेवून पुढच्या वर्षी २६ जानेवारी असे जोडप्यांचे सत्कार करण्याचे ठरविले. दर सहा महिन्यांनी गावात जन्माला येणा-या मुलींचा जन्मांचे स्वागत करण्यासाठी बालिका जन्मोत्सव साजरा करण्याचे ठरले. बीड जिल्ह्यातील मुलींची संख्या आता हळूहळू वाढताना दिसत आहे. । । । । ...४५...