पान:लेक लाडकी (Lek Ladaki).pdf/47

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

घ्यावीत. जिल्ह्यातील या विषयातील तज्ञ व्यक्तींना मार्गदर्शन करण्यासाठी गावातील, भागातील विशेष प्रावीण्य मिळविलेल्या मुलींचा सत्कार करावा. संध्याकाळी मुलींच्या बाबांचे अनुभव कथनाचा कार्यक्रम आयोजित करावा. रात्री पणत्या हातात घेवून वेगवेगळे संदेश देणा-या घोषणा देत प्रबोधन फेरी काढावी. गावातील प्रत्येक घरात एक झाड देवून एक मुलगी, एक झाड वाढविण्याचा संदेश द्यावा. प्रश्न - व्हीलेज हेल्थ प्लॅनमध्ये या विषयाचा अंतर्भाव कसा करता येईल? व्हीलेज हेल्थ प्लॅनमध्ये इतर संबंधीत मुद्दयांबरोबरच स्वच्छता आणि आहाराच्या मुद्द्यांबरोबरच मुलींची घटती संख्या आणि कायद्याच्या अंमलबजावणीबाबत गावपातळीवर देखरेख ठेवणे ही आपली जबाबदारी आहे. गावपातळीवरील ० ते ६ वयोगटातील मुला-मुलींच्या संख्येचा समतोल राखला जातो आहेना ? याबाबत ग्रामपंचायत स्तरावर लक्ष ठेवणे, आढावा घेणे, चर्चा करणे. गरोदर मातांच्या आहार आणि लसीकरणाबरोबरीनेच गर्भलिंग निदान प्रतिबंधक कायद्याची माहिती देणे त्यांच्या कुटुंबियांकडून त्यांच्यावर गर्भलिंग निदानासाठी दबाव टाकला जाणार नाही. यांच्यावर आशा, अंगणवाडीताई आणि ए.एन.एम. यांच्या मदतीने मदत करणे. मुलींच्या जन्मानंतर त्यांच्या आरोग्याकडे व शिकवताना विशेषत्याने लक्ष द्यावे. मुलगी म्हणून तिला वाढवताना भेदभाव होणार नाही याकडेही लक्ष द्यावे. गावाला सोनोग्राफी, गरोदर मातांची तपासणी आणि प्रसुतीगृहाची सेवा ...४२...