पान:लेक लाडकी (Lek Ladaki).pdf/46

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

| | । । कायद्याची माहिती सांगून कोणत्याही परिस्थितीत गरोदर मातेने गर्भलिंग निदान करू नये, यासाठी त्यांना शपथ द्यावी. गरोदर मातेची सोनोग्राफी झाली असल्यास त्याची कागदपत्रे व्ही.एच.एन.एस. कमिटीकडे माहितीसाठी एकत्र करून ठेवावी. सासर-माहेरच्या कोणीही गर्भलिंग निदान करण्यासाठी दबाव आणलेस त्याबाबतची माहिती समुचित प्राधिका-यांना कळवावी. नवविवाहीतांना शपथ: | गावामध्ये दर सहा महिन्यांनी नवीन लग्न झालेल्या जोडप्यांना । "आम्ही दोघेही पती-पत्नी स्त्री-पुरुष समतेचा आदर करतो. कोणत्याही परिस्थितीत अपत्य प्राप्तीचे वेळी आम्ही गर्भलिंग निदान करणार नाही." अशी शपथ द्यावी. कमी होणा-या मुलींच्या संख्येविषयीची गंभीरता लक्षात आणून देवून भविष्यात ते गर्भलिंग निदान करणार नाहीत याबाबत काळजी घ्यावी. दोन किंवा त्यापेक्षा जास्त मुली अपत्य असणा-या जोडप्याना शपथ देणे. ७. लेक लाडकी या घरची - एक दिवस लाडक्या लेकीसाठी: मुलींची कमी होणारी संख्या हा बीड जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रासमोरील गंभीर प्रश्न आहे. आपल्या गावामध्ये निसर्गत: मुलामुलींची संख्या समान राहण्यासाठी विविध कार्यक्रम घेण्यात यावेत. सकाळी लेक लाडकी अभियानाच्या रांगोळीच्या स्पर्धा घेण्यात याव्यात. दुपारी सासू-सुनांचा मेळावा आयोजित करावा. स्त्री-पुरुष समतेचे महत्त्व सांगणारे चित्रकला, पोस्टर्स स्पर्धा घेण्यात याव्यात. गावातील ग्रामपंचायतीचे सदस्य, विविध मंडळांचे पदाधिकारी यांची कमी होणारी मुलींची संख्या आणि स्त्री-पुरूष समतेवर सभा आणि व्याख्याने ...४१...