पान:लेक लाडकी (Lek Ladaki).pdf/45

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

ग्रामपंचायतीच्या दर्शनी भागात लावणे आणि दर महिन्याचा आढावा घेवून ५ । तारखेपर्यंत होणारा बदल नोंदविणे. २. बालिका जन्मोत्सव: एका वर्षामध्ये जन्माला आलेल्या मुलींचा वर्षातून एकदा तिचा आणि तिच्या आईचा शुभेच्छा देवून, बाळाला कपडे देवून आणि ग्रामपंचायतीच्या ऐपतीप्रमाणे एफ.डी. देवून तिच्या जन्माचे स्वागत करावे. ३. युवासंसद: गावातील तरूण मुला-मुलींचे सर्वेक्षण करून त्यांची तीन विषयांबाबत युवासंसद भरवावी. १)हुंडा देणार-घेणार नाही. २) दुजा भावाने वागणार नाही,हिंसा करणार नाही आणि ३) माझे अपत्यप्राप्तीचे वेळी गर्भलिंग निदान करणार नाही. या तीन विषयाबाबत वेगवेगळी माध्यमे वापरून चर्चा घडवून आणावी आणि शपथ द्यावी. सदर शपथपत्राचे लिखित स्वरूपातील एक प्रत संबंधीत युवक-युवतीकडे आणि एक प्रत व्ही.एच.एन.एस. कमिटीकडे जमा करून ठेवावी. या युवा संसदेचे आयोजन तीन महिन्यांच्या अंतराने तीन वेळा घेण्यात यावे. युवा संसदेच्या या कार्यक्रमाला योग्य त्या वृत्तपत्रामधून प्रसिध्दी द्यावी. ४. गरोदर मातांना शुभेच्छा: दर तीन महिन्याने गावातील गरोदर महिलांना एकत्र बोलावून त्यांचे गावाला असणा-या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या सहकार्याने आरोग्य तपासणी करणे, आहाराविषयी माहिती सांगणे आणि गर्भलिंग निदान प्रतिबंधक ...४०...