पान:लेक लाडकी (Lek Ladaki).pdf/44

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

। =

= = =

= = = प्रकरण) अण आपण काय करू शकतो ? प्रश्न २२- व्ही.एच.एन.एस. समितीचे सदस्य म्हणून आपण काय काय करू शकतो ? १) व्हीलेज हेल्थ प्लॅनमध्ये हा विषय घेऊ शकतो. गावातील सर्व घटकांच्या आरोग्याच्या गरजांचे नियोजन करणे आणि त्याची अंमलबजावणी होण्यासाठी सतत कार्यक्षम राहणे यासाठी व्ही.एच.एन.एस. समितीची निर्मिती राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य मिशन अंतर्गत करण्यात आली आहे. मुलींची कमी होणारी संख्या हा बीड जिल्ह्यासह महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील गंभीर प्रश्न बनला आहे. म्हणूनच स्त्रीयांच्या कमी होणा-या संख्येचा गावाच्या आरोग्य नियोजनात सर्व सदस्यांनी नीट । शास्त्रीय पध्दतीने अभ्यास करणे गरजेचे आहे. तसेच गावातील सर्व । वयोगटातील घटकांना सामावून घेता येईल अशा कार्यक्रमांचे आयोजन करणे गरजेचे आहे. सातत्याने मुलींची कमी होणारी संख्या कुपोषण, लसीकरण,बालिका मृत्यु,मुली म्हणून मुलीकडे होणारे दुर्लक्ष या गोष्टीचा व्हीलेज प्लॅनमध्ये अंतर्गत करून नियमितपणे सदर विषयाचा पाठपुरावा करणे गरजेचे आहे. आणि म्हणूनच व्हीलेज प्लॅन अंतर्गत खालील कार्यक्रमांचा अंतर्भाव करता येईल. ‘आकडे बोलतात' - गावात लिंग गुणोत्तराचा बोर्ड लावणे. "आम्ही स्त्री-पुरूष समतेच्या तत्त्वाचा आदर करतो. आमच्या गावात मुलगा, मुलगी मध्ये भेदाभेद केला जात नाही." असा मजकूर असणारा ० ते ६ वर्षे । वयोगटातील मुला-मुलींच्या संख्येबाबत माहिती सांगणारा बोर्ड ...३९...