पान:लेक लाडकी (Lek Ladaki).pdf/43

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

| | आहेत, या दृष्टीकोनातून पाहणं गरजेचे आहे. या भूमिकेतून गर्भलिंग निवडीला विरोध करायला हवा. गर्भलिंग निवडीविषयी बोलताना किंवा लिहीताना कुठल्याही पध्दतीने स्त्रियांना लक्ष करणे चुकीचे आहे. महाराष्ट्रात झालेले सर्व गर्भपात हे गर्भलिंग निवडीसाठी नसतात म्हणून गर्भपाताचा विरोध करणे चूक आहे. गर्भलिंग निवडीनंतर होणा-या बेकायदेशीर गर्भपातासाठी आधी गर्भलिंग निदान व्हावे लागते हे लक्षात घेणे गरजेचे आहे. म्हणूनच सोनोग्राफीचा आणि जनुकिय तंत्राचा गैरवापर रोखण्यासाठी पी.सी.पी.एन.टी.डी. कायद्याची अंमलबजावणी अधिक लक्ष केंद्रीत केले पाहिजे आणि स्त्रीयांच्या गर्भपाताचा हक्क अबाधित राहील असे पाहिले पाहिजे. ...३८...