पान:लेक लाडकी (Lek Ladaki).pdf/42

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

होणार असतील तर. जन्माला आल्यास अपत्यामध्ये गंभीर व्यंग निर्माण करू शकतील अशा शारीरिक किंवा मानसिक विकृती असतील तर. | | | | | | | बलात्कारानंतर दिवस राहिले असतील तर. एखाद्या विवाहीत स्त्रीने किंवा तिच्या पतीने वापरलेली गर्भनिरोधक पध्दत किंवा साधन निकामी ठरल्याने दिवस गेले असतील तर. १२ आठवड्यापुढील व २० आठवड्यापर्यंत गर्भपात करावयाचा झाल्यास दोन स्त्रीरोग तज्ञांची मते आवश्यक आहेत. प्रश्न - कोणत्या गोष्टीकडे विशेषत्वाने लक्ष द्यावे लागेल? मुली कमी झाल्या म्हणून त्यांचा दर्जा सुधारेल किंवा त्यांना महत्व प्राप्त होईल असे मानणे चुकीचे आहे. किंबहुना मुलींची संख्या कमी झाल्यास मुलींची पळवापळवी केली जाईल. त्यांच्यावरील अत्याचारात वाढ होईल. । । । भृणहत्या, स्त्रीभृण हत्या या शब्दांचा वापर टाळायला हवा - कारण स्त्रियांसाठी गर्भपाताचा अधिकार खूप महत्त्वाचा आहे. हत्या म्हटल्याने या अधिकारावर गदा येते व हत्या या शब्दाच्या वापरातून अपराधी असल्याची भावना निर्माण होवू शकते. भविष्यात भावांना बहिणी मिळणार नाहीत किंवा लग्नासाठी मुली । मिळणार नाहीत अशी कारणं देणं टाळायला हवं - कारण मुलींकडे नेहमी आई, पत्नी, बहीण या चौकटीमध्ये न बघता त्या या देशाच्या नागरिक आहेत आणि पुरूषांप्रमाणेच त्यांना समान हक्क ...३७...