पान:लेक लाडकी (Lek Ladaki).pdf/40

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

'OPD Register' शी 'F'Form पडताळून पाहावा. जन्म नोंदणी रजिस्टर मधील मुलामुलींच्या जन्म नोंदीचे आकडे व प्रमाण अभ्यासा. गर्भलिंग निदान प्रतिबंधक कायद्यानुसार तपासणी केल्यावर त्रुटी आढळल्यास तक्रार कायदेशीर भाषेत लिहून कलम २३ नुसार प्रथम वर्ग न्यायदंडाधिका-यांकडे गुन्हा ४८ तासात दाखल करा. तत्पुर्वी कलम ३० नुसार तपासणी आणि जप्तीची कायदेशीर भाषेत तक्रार लिहून कलम २३ नुसार प्रथम वर्ग न्यायदंडाधिका-यांकडे गुन्हा ४८ तासात दाखल करा. तत्पुर्वी कलम ३० नुसार तपासणी आणि जप्तीची कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करावी. तपासणी अहवाल बनवा. पंचनामा करावा. संबंधीत सेंटरची नोंदणी निलंबित करावी. कारणे दाखवा नोटीस द्यावी. जिल्हा सल्लागार समितीच्या बैठकीत ठराव पास करून नोंदणी रद्द करून मगच गुन्हा दाखल करावा. ...३५...