पान:लेक लाडकी (Lek Ladaki).pdf/37

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

३. पोलिसांकडे अगर पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल होत नाही. ४. कलम ३१ नुसार समुचित प्राधिकारी यांना संरक्षण असून त्याचेवर गुन्हा दाखल होवू शकत नाही. ५. कलम २८(१) अ नुसार समुचित प्राधिकारी यांचेवतीने कोणासही समुचित अधिकारी म्हणून कायद्यानुसार काम करता येते. फौजदारी दंड संहिता सदर कायद्यास लागू आहे. ७. कलम २८(१) ब नुसार कोणीही व्यक्ती अगर स्वयंसेवी संस्था १५ दिवसांची नोटीस समुचित प्राधिकारी यांना देवून कोर्टात तक्रार दाखल करू शकते. सदर कायदा मातेला मुलगी वाचवण्यासाठी तिच्यासह समस्त समाजाची मदत देवू करतो. मुलगी अस्तित्वात नसताना स्त्री म्हणून तिच्या समानतेसाठी लढा देण्यास बळ देणारा हा कायदा आहे. नियम ५ नुसार सर्व सेंटर्सनी नोंदणी फी रू. पंचवीस हजार डी.डी. ने समुचित प्राधिकारी यांच्याकडे जमा करणेची आहे. सदरची रक्कम प्राधिका-यांनी कायद्याच्या अंमलबजावणीसाठी वापरावयाची आहे. ८. १०. नियम ११ व १२ नुसार समुचित प्राधिकारी यांना सेंटरची तपासणी करून त्रुटी आढळल्यास सर्व कागदपत्रे ताब्यात घेवून मशिन सील करण्याचा अधिकार आहे. परंतू मशीन परत उघडून देण्याचा अधिकार नाही. ११. सदर कायदा हा गर्भलिंग निदान करून निवडीला विरोध करणारा आहे. गर्भपाताला विरोध करणारा नाही. वैद्यकीय गर्भपाताचा कायदा १९७१ नुसार गर्भपात हा स्त्रीचा आरोग्य हक्क आहे. ...३२...