पान:लेक लाडकी (Lek Ladaki).pdf/36

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

कलम २३ नुसार गर्भलिंग निदान करणा-या डॉक्टरला ३ वर्षे सक्तमजुरी व रू. दहा हजार दंडाची शिक्षा आहे. तसेच ५ वर्षासाठी संबंधीत डॉक्टरची नोंदणी रद्द करण्यात येते. सदर व्यक्ती पुन्हा हा गुन्हा करताना आढळल्यास ५ वर्षे सक्तमजुरी रू. पन्नास हजार दंड व सनद कायमची रद्द करण्यात येते. सदर कायद्याच्या कोणत्याही कलमांचा वा नियमांचा भंग झाल्यास वरीलप्रमाणे शिक्षा आहे. तसेच गर्भलिंग निदानाची सेवा मागणारे गर्भवती महिलेचे नातेवाईक, मध्यस्थ व इतर संबंधीत कोणाही व्यक्तीला ५ वर्षे सक्त मजुरी व रु. पन्नास हजार दंडाची शिक्षा आहे. सदर गुन्ह्यात संबंधीत व्यक्ती पुन्हा सापडल्यास रु. एक लाखापर्यंत दंड व ५ वर्षे सक्तमजुरीची शिक्षा होवू शकते. गर्भवती महिलेवर कलम २४ नुसार सदर कायद्यान्वये गुन्हा दाखल करता येत नाही. कलम २० नुसार सोनोग्राफी केंद्राची नोंदणी निलंबित तसेच नोंदणी रद्द करण्याचाही अधिकार समुचित प्राधिका-यांना आहे. कलम २७ नुसार सदर गुन्हा दखलपात्र, अजामीनपात्र आणि सामंजस्याने न सोडवता येणारा (म्हणजेच नॉन कंपाऊंडेबल) आहे. कलम २८ नुसार सदर गुन्हा थेट प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांचे न्यायालयात समुचित प्राधिकारी दाखल करतील. प्रश्न १७ - या कायद्याची वैशिष्टे सांगा. कलम १७(ए), कलम ३० व नियम ११ व १२ नुसार सोनोग्राफी सेंटरची तपासणी करणे, शोध व जप्ती कारवाई करणे, नोटीस काढणे, नोंदणी निलंबित/रद्द करणे, गरज पडल्यास ‘सर्च वॉरंट' काढणे हे सर्व अधिकार समुचित प्राधिकारी यांना देण्यात आले आहेत. म्हणजेच दिवाणी न्यायाधिशांएवढे अधिकार समुचित प्राधिकारी यांना आहेत. | २ गर्भवती महिलेवर सदर कायद्यानुसार गुन्हा दाखल होत नाही. १. ...३१...