पान:लेक लाडकी (Lek Ladaki).pdf/35

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

प्रत्येक महिन्याच्या ५ तारखेपर्यंत हे सर्व फार्मस् समुचित प्राधिकारी यांचेकडे पाठवावे लागतात. पाच रकान्याचे सोनोग्राफी रजिस्टर भरावे लागते. नियम ९(१) कलम ४(३) नुसारच्या विशेष नियमानुसार कायद्याने घालून दिलेले सर्व कागदपत्र संबंधीत केंद्राने ठेवणे बंधनकारक असून त्यात त्रुटी आढळल्यास कलम ५ व ६ चा भंग केल्याचा गुन्हा सिध्द झाल्याचे मानण्यात येईल व निर्दोषत्व सिध्द करण्याची जबाबदारी संबंधीत सेंटरची राहील. कलम ५ नुसार गर्भवती महिलेची संमती तिच्या मातृभाषेत घेणे व संमतीची प्रत तिला देणे बंधनकारक आहे. नियम १०(१) अ नुसार सेवा देणा-या डॉक्टरने आणि गर्भवती महिलेने सदर सेवा ही गर्भलिंग निदानासाठी घेत नसल्याचे लिखित स्वरूपात जाहीर करणे बंधनकारक आहे. नियम १७(१) नुसार' येथे गर्भलिंग निदान केले जात नाही" असा स्थानिक भाषेतील व इंग्रजी भाषेतील फलक लावणे बंधनकारक आहे. नियम १७(२) नुसार सदर कायद्याचे स्थानिक भाषेतील पुस्तक ठेवणे बंधनकारक आहे. प्रश्न - गर्भलिंग निदान व निवड करताना कोणी आढळल्यास कारवाई कशी केली जाते ? कलम ३(अ) व कलम ६ नुसार गर्भधारणापूर्व व प्रसवपूर्व गर्भाचे लिंग तोंडी, लेखी किंवा खाणाखुणानी गर्भवती महिलेला किंवा अन्य कोणासही सांगण्यास बंदी आहे. कलम २२ नुसार गर्भलिंग निदानाची जाहीरात करणेस बंदी आहे. ...३०...