पान:लेक लाडकी (Lek Ladaki).pdf/33

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

TL याप्रमाणेच तालुका स्तरावर समुचित प्राधिकारी कार्यरत आहेत. महानगरपालिका स्तरावर स्वतंत्र समुचित प्राधिकारी व सल्लागार समिती कार्यरत आहे. प्रश्न - समुचित प्राधिकारी कोण असतात? त्यांचे मुख्य काम काय आहे? सरकारी गॅझेटमध्ये प्रसिध्दी करून एक किंवा अनेक समुचित प्राधिकारी नेमण्याची राज्य सरकारची जबाबदारी आहे. महाराष्ट्रात जिल्हा शल्य चिकित्सक व ग्रामीण रुग्णालय/उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक तसेच महानगरपालिकेतील वैद्यकीय अधिकारी हे सदर कायद्याच्या अंमलबजावणीसाठी नेमण्यात आलेले समुचित प्राधिकारी आहेत. त्यांची नेमणूक ही समुचित प्राधिकारी म्हणून पदसिध्द अशी सरकारी गॅझेटमध्ये प्रसिध्द करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी, तहसिलदार, प्रांताधिकारी, महानगरपालिकेचे आयुक्त अशा महसूली अधिका-यांना देखील समुचित प्राधिकारी म्हणून अधिकार देण्यात आलेले आहेत. त्यांचे मुख्य काम पुढीलप्रमाणे आहे. (कलम १७(१) नुसार) सर्व सोनोग्राफी मशिन आणि तंत्रज्ञान बनविणा-या, विकणान्या आणि उपलब्ध करणाच्या कंपन्यांची माहिती घेणे आणि त्यांच्या व्यवसायावर देखरेख ठेवणे. सोनोग्राफी मशिन व जनुकीय तंत्रज्ञानाची सेवा देणा-या यंत्रणांची नोंदणी करणे आणि त्यांच्या कामकाजाची तपासणी करणे, त्यांचे मुल्यमापन करणे. नोंदणीकृत केंद्रावर अगर इतरत्र गर्भलिंग निदान तंत्राचा दुरूपयोग करून गर्भलिंग निदान होत असल्यास कायदेशीर कारवाई करणे. प्रश्न - सल्लागार समितीत कोण असतात ? सदर समुचित प्राधिकारी यांना कायद्याचे अंमलबजावणीत मदत करण्यासाठी त्यांच्यासह आठ सदस्यांची सल्लागार समिती आहे. त्यामध्ये - वैद्यकीय क्षेत्रातील ३ सदस्य, स्त्री रोग तज्ञ, प्रसुतीशास्त्र तज्ञ, बालरोग तज्ञ, जनुकीय तज्ञ, ...२८...