पान:लेक लाडकी (Lek Ladaki).pdf/31

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

तसेच सदर कायद्याचे उल्लंघन सेवा देणाच्या केंद्रावरील डॉक्टरांकडूनच अगर सेवा घेणा-या कुटुंबियांकडून झाल्यास त्यांच्यावर कारवाई करणे आणि गुन्हा दाखल करणे हे कायद्याचे मुख्य हेतू आहेत. प्रश्न - कायदा अंमलबजावणीतून काय साध्य करता येईल? तंत्रज्ञानाचा गैरवापर होवू नये. गर्भलिंग निदान होवून त्यांची निवड केली जावून गर्भात मुली असल्यास बेकायदेशीर गर्भपात होवू नयेत. निदान तंत्रे यांचे नियमन करणे. वरीलप्रमाणे कायद्यामागील तीन उद्देश आहेत. प्रश्न - कायद्याचे स्वरूप कसे आहे? सदर कायदा हा तंत्रज्ञानाचा गैरवापर करून गर्भलिंग निदान आणि निवड करण्यास मदत करणा-या फौजदारी स्वरूपाच्या संघटीत गुन्हेगारी रोखण्यासाठी अंमलात आणला आहे. सदर कायदा हा एकूण ९ प्रकरणात म्हणजेच ८ प्रकरणे कलमांची आणि एक प्रकरण नियमांचे असा विभागला आहे. कायद्यामध्ये १ ते ३४ कलमे आणि १ ते १९ नियम आहेत. A ते H असे विहीत नमुन्यातील फॉर्म आहेत. कायदा समजुन घेण्यासाठी ही ९ प्रकरणे, ३४ कलमे, १९ नियम, ८ फॉर्मस् समजून घ्यावे लागतील. ...२६...