पान:लेक लाडकी (Lek Ladaki).pdf/30

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

आणि सदर कायद्याचे नाव गर्भधारणापूर्व आणि प्रसुतीपूर्व निदान तंत्र (गर्भलिंग निदान प्रतिबंध) कायदा १९९४, सुधारित २००३ असे करण्यात आले. प्रश्न - गर्भलिंग निदान तंत्रज्ञान रोखणाच्या कायद्याचे नाव काय आहे? गर्भधारणापूर्व आणि प्रसुतीपूर्व निदान तंत्र (गर्भलिंग निदान प्रतिबंध) कायदा १९९४, सुधारित २००३ असे या कायद्याचे नाव आहे. गर्भलिंग निदान आणि निवडीला कायदा प्रतिबंध करतो. सर्व सोनोग्राफी सेंटर्स, जेनेटिक कौन्सिलिंग सेंटर्स आणि लॅब कायद्याच्या कक्षेत आणून नोंदणी करणे बंधनकारक करतो. या सर्व केंद्राची देखरेख करणे, तपासणी करणे. त्या सर्व केंद्रावर कायद्याची कडक अंमलबजावणी करणे. सदर कायद्याचे उल्लंघन आढळल्यास सदर कायद्यात निर्देशित केल्यानुसार गुन्हा दाखल करण्याची तरतूद सदर कायद्यात केली आहे. प्रश्न - कायद्याचा हेतू काय आहे? कायद्याच्या नावातच कायद्याचा हेतू स्पष्ट झाला आहे. गर्भधारणापूर्व आणि प्रसवपूर्व म्हणचे गर्भधारणेपूर्व आणि बाळंतपणापूर्वी गरोदर असताना गर्भाचे लिंग जाणून घेण्यास आणि निवडण्यास हा कायदा प्रतिबंध करतो म्हणजे बंदी घालतो. अशी निवड करू शकणारे सर्व सोनोग्राफी सेंटर, जेनेटीक कौन्सेलिंग सेंटर । आणि लॅब म्हणजेच जनुकीय समुपदेशन केंद्रे आणि प्रयोगशाळा यांना कायद्याच्या कक्षेत आणून नोंदणी करणे या कायद्यानुसार बंधनकारक आहे. या सर्व केंद्रावर देखरेख करणे, तपासणी करणे आणि त्या सर्व केंद्रावर कायद्याची कडक अंमलबजावणी होईल असे पाहणे. ...२५...