पान:लेक लाडकी (Lek Ladaki).pdf/11

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

शेती व्यवस्थेत स्त्रियांचे स्थान: बदललेल्या शेती व्यवस्थेत स्त्रियांची कामगार म्हणून जागा अनेक यंत्रांनी काबीज केली आहे, त्यामुळे श्रमशक्ती म्हणून तिची गरज संपली आहे. ऊस शेतीमध्ये स्त्रियांना स्थानच राहिलेले नाही. शिवाय स्त्रिया ज्या ठिकाणी कामाला जातात, ती कामाची ठिकाणे आणि त्या ठिकाणी शोषण आणि हिंसेत प्रचंड वाढ झाली आहे. या भितीमुळे मुलींचे जन्म नाकारले जातात. मुक्त अर्थ व्यवस्थेत आणि जागतिकीकरणात महिलांच्या शरीराचे आणि लैंगिकतेचे व्यापारीकरण प्रचंड वेगाने सुरू आहे. ही बाब मुलगी नको ही मानसिकता वाढविण्यास कारणीभूत ठरत आहे. | • उपलब्ध तंत्रज्ञान: देवानंतर डॉक्टरला लोक मानायचे; परंतू वैद्यकीय क्षेत्रातील ढासळलेली नैतिकता, वाढलेले व्यापारीकरण आणि मुलगा हवा हा हट्ट पुरविण्यासाठी उपलब्ध तंत्रज्ञान यामुळेही सुप्त मनातील मुलगी नको' हा विचार साकारायला मदत होत आहे. असमानतेची वागणूक : राज्य घटनेने स्त्रियांना समानतेची वागणूक देण्याची ग्वाही दिली आहे. गर्भाशयापासून थडग्यापर्यंत स्त्रियांचे संरक्षण करण्यासाठी ४२ हून अधिक कायदे असूनही त्या कायद्यांची परिणामकारक अंमलबजावणी होत नाही, ही वस्तुस्थिती आहे. स्त्रियांचे शोषण करणारी त्यांना दुजाभावाने वागविणारी आणि हिंसा करणारी पुरूषसत्ताक व्यवस्था कायदे असूनही आजही अबाधित आहे. म्हणूनच ज्या ...६...