पान:लिंग पद समभाव (जेंडर) आणि कौटुंबिक हिंसाचार.pdf/९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

मान्य नसते, मग अशा स्त्रिया 'नोकरी कर पण घरातल सर्व आवरुन जा, आम्हांला काही कमी नको पडायला ही घरच्यांची अट मान्य करून तडजोड स्विकारतात आणि तारेवरची कसरत करतात.

४. कधी सहमत तर कधी नकार - असे लोक वेळ, पैसा, काळ, साधनं, प्रसंग पाहून कधी कधी काही काही ठिकाणी समाजाने घालून दिलेले नितीनियम मान्य करतात तर काही काही ठिकाणी विरोध करतात. उदा. ब-याच घरांमध्ये स्वतःच्या विवाहीत मुलीने पंजाबी ड्रेस घातला तर चालतो पण सुनेने घातला की 'आमच्याकडे हे असले लाड

चालत नाही म्हणून सुनेला मान्य करणार नाही.

५. बाहेर एक आत एक- हे लोक सार्वजनिक ठिकाणी स्त्री-पुरुष समानता याविषयावर जोरदार बोलणार पण स्वतःची मुलगी सात नंतर बाहेर गेली, उशीरा आली किंवा तिने स्वतःचा काही स्वतंत्र निर्णय घेतला तर यांना चालत नाही. शिवाजी जन्मो पण दुस-याच्या घरात ही म्हण अशा लोकांमुळेच तयार झाली असेल.

६.तटस्थ- तटस्थपणा ही एक मानसिक प्रकिया आहे, ती फारच कमी लोकांच्या आयुष्यात घडते. अशा लोकांना लिंगाने ते स्त्री आहे की पुरुष याने काही फरक पडत नाही. ते करित असलेली कामे ते करणारच असतात. उदा. आपल्याकडचे संत. आपण मिराबाईचे उदाहरण घेऊ या. तिची कृष्णावर असलेली श्रद्धा इतकी अतूट होती की

समाजाने त्यावरून तिला कितीही त्रास दिला तरि ती तिची भक्ती/भूमिका थांबवत नाही.

प्रकरण चौथे
Gender and BIOLOGY
जेंडरचा जीवशास्त्राशी संबंध

 प्रत्येक नविन जीव जन्माला येण्यासाठी एका स्त्री-पुरुषाचा समागम होऊन स्त्री पुरुष बीजाचा संयोग होणे आवश्यक आहे हे आता आपल्याला पाठ झाले आहे. हया बीजांमार्फत आपल्याला आपल्या आईवडिलांकडून गुणसूत्राच्या जोडया मिळतात. म्हणून तर आपण आपल्या आईवडिलांसारखे दिसतो, वागतो, बोलतो. यात स्त्री कडे सर्व xx प्रकारच्या गुणसूत्रांच्या जोडया असतात तर पुरुषाकडे xy अशा गुणसूत्रांच्या जोडया असतात. स्त्रीकडून xx अशा 23 गुणसूत्राच्या जोडया तर पुरुषाकडूनही xx अशा 23 गुणसूत्रांच्या जोडया असे मिळून 46 गुणसूत्रांच्या जोडयांचा संयोग होऊन स्त्रीचा जन्म होतो, तर पुरुषाच्या जन्माच्या वेळी स्त्रीकडून गग अशा 23 गुणसूत्रांच्या जोडया तर पुरुषाकडून गल अशा 22 गुणसूत्रांच्या जोडया असे मिळून 45 गुणसूत्रांच्या जोडया एकत्र येऊन पुरूषाचा जन्म होतो. याचा अर्थ पुरुषाच्या जन्मात एक गुणसूत्राच्या जोडीची कमी असते. या 46 व्या गुणसूत्राच्या जोडीमुळे गर्भाशय तयार होते. म्हणून पुरुषाला गर्भाशय नसते तर स्त्रीला ते जन्मतःच असते. याचा अर्थ स्त्री


लिंग पद समभाव (जेंडर) आणि कौटुंबिक हिंसाचार.....७