पान:लिंग पद समभाव (जेंडर) आणि कौटुंबिक हिंसाचार.pdf/१०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

वयात येते तेव्हा तिचे गर्भाशय फकत सकिय होते. पुरुषाला गर्भाशय नाही म्हणून त्याला मासिक पाळीही येत नाही. त्याचा पाप पुण्याशी काही संबंध नाही. स्त्रीच्या बिजाशी पुरुष बिजाशी संयोग झाला तर गर्भधारणा होते.

 प्रत्येक स्त्रीचे गर्भाशय हे तिच्या मुठी एवढे असते. मुलगी साधारण 12-13 वर्षाची झाली की, तिचे शरीर बीजकोषातून आलटून पालटून दर महिन्याला एक बीजांड त्या कोषाच्या बाहेर फेकते. जेव्हा ते बीजांड बाहेर पडते तेव्हा स्त्रीबीज शोषण्यासाठी गर्भाशयाची बोटं अखंड हालचाल करीतच असतात, ती बोटं लगेच हे स्त्रीबीज शोषतात आणि बीजवाहक नळीद्वारे गर्भाशयात आणतात जेव्हा स्त्रीबीजाचा प्रवास सुरु होतो. या प्रवासात त्या बीजाचा पुरूष बीजाशी संयोग झाला तर जन्माला येणा-या बाळासाठी आपले शरीर अतिशय उत्कृष्ट रक्ताची गादी गर्भाशयात तयार करते. जर हे स्त्रीबीज गर्भाशयात बीजांड शोषणारी बोटं गर्भाशय बाळासाठी रक्ताची गादी स्त्रीबीज कोष बीजवाहक नळया असतांना त्याला शारीरिक संबंधाव्दारा पुरुष बीज मिळाले तर त्याचे एक एकत्र बीज तयार होते. त्याबरोबर त्याच्याभोवती एक पातळ आवरण तयार होते; ज्यामुळे त्यानंतर ते बीज सुरक्षित होते. असे हे बीज त्या रक्ताच्या गादीवर स्थिर होते आणि तिथे ते पोसले जाते आता स्त्रीबीज गर्भाशयात आले पण त्याचा पुरुष बीजाशी संयोग झालाच नाही तर ते स्त्रीबीज निकामी होते आणि योनीमार्गाने शरीराबाहेर पडते. हे जेव्हा आपल्या मेंदूला कळते तेव्हा आपले शरीर ती बाळासाठी तयार केलेली गादी काढून घेते. ती रक्ताची गादी मग योनीमार्गे रक्ताच्या रूपाने बाहेर पडते. या प्रक्रियेलाच "मासिक पाळी" म्हणतात वरिल.

 वरिल प्रमाणे स्त्री पुरुषाचा संयोग झाला तर त्यामुळे मुल जन्माला येते. मुलाच्या जन्माच्या वेळेची गुणसूत्रांची रचना आपण पाहिली तर ती xy अशी असते. म्हणजे त्यात एक गुणसूत्राची जोडी कमी असते. यावरून स्त्रीवादी चळवळीचा एक प्रवाह अशी मांडणी करतो की, स्त्री ही जन्मापासूनच परिपूर्ण तर पुरुष अपूर्ण. 46 व्या गुणसूत्राामुळे बाईला जन्मतःच गर्भाशय असते, ज्यामुळे ती संवेदनशिल, सृजनशील बनते दोघांमध्ये


लिंग पद समभाव (जेंडर) आणि कौटुंबिक हिंसाचार.....८